पुणे महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मुख्य जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे बुधवारी (१५ ) आणि गुरुवारी (१६) शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ज्या भागातील पाणी बंद आहे, तेथे दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे पाणी पुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
( हेही वाचा : राज्यात ‘पीएम श्री’ योजना राबवणार; पहिल्या टप्प्यात ८१६ शाळांचा विकास)
पुण्यातील या भागात पाणीपुरवठा बंद
बिबवेवाडी, अप्पर व सुपर इंदिरानगर, संभाजीनगर, काशिनाथ पाटीलनगर, लोअर इंदिरानगर, चिंतामणीनगर, स्टेट बॅंकनगर लेक टाऊन, गंगाधाम, बिबवेवाडी, कोंढवा रस्ता, विद्यासागर कॉलनी, सॅलिसबरी पार्क, महर्षीनगर, डायस प्लॉट, मार्केट यार्ड, धनकवडी, गुलाबनगर, चैतन्यनगर, तळजाई वसाहत परिसर.ससाणेनगर, काळेबोराटे नगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, वानवडी, चंदननगर, खराडी, रामटेकडी, माळवाडी, भोसले गार्डन, १५ नंबर आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेवनगर, मगरपट्टा परिसर.
Join Our WhatsApp Community