१९ जानेवारीला पुण्यातील पाणीपुरवठा राहणार बंद!

75

महापालिकेच्या शहरातील सर्व जलशुद्धीकरण केंद्रातील तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी १९ जानेवारीला संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी २० जानेवारीला सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे, त्याची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

( हेही वाचा : ठाणेकरांनो लक्ष द्या! १८ जानेवारीला पाणीपुरवठा राहणार बंद)

महापालिकेच्या पर्वती, लष्कर, होळकर, भामा आसखेड, वारजे, वडगाव व कोंढवे धावडे जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत येणाऱ्या पाण्याच्या टाक्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने गुरुवारी १९ जानेवारीला काही पेठांसह उपनगरांमधील काही भागांचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. असे पाणी पुरवठा विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी स्पष्ट केले आहे.

या भागात येणार नाही पाणी…

  • पार्वती पाणीपुरवठा केंद्र ( पार्वती, पद्मावती, इंदिरानगर पम्पिंग)
  • वडगाव पाणी केंद्र क्षेत्र
  • चतुश्रृंगी/SNDT/वारजे जलकेंद्र परिसर
  • छावणी पाणीपुरवठा केंद्र भाग
  • न्यू होळकर आणि चिखली पम्पिंग क्षेत्र
  • भामा आसखेड पाणी केंद्र क्षेत्र१९ जानेवारीला पुण्यातील पाणीपुरवठा राहणार बंद
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.