१ मार्चला कोथरुड, डेक्कनसह पुण्यातील ‘या’ भागातील पाणी पुरवठा बंद!

पुणे शहरातील एसएनडीटी भागातील पाण्याच्या टाक्यांना जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात फ्लो मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे या परिसरातील पाणीपुरवठा येत्या बुधवारी १ मार्च २०२३ ला बंद राहणार आहे.

( हेही वाचा : भाजपमुळे इतर पक्षांच्या माजी नगरसेवकांना प्रत्येकी तीन कोटींच्या विकास कामांची लॉटरी? )

पुणे महापालिकेच्या समान पाणी पुरवठा प्रकल्पाअंतर्गत शहराच्या विविध भागातील पाण्याच्या टाक्यांना फ्लो मीटर बसवण्यात येणार आहेत. त्यानुसार, एसएनडीटी भागात फ्लो मीटर बसविण्याचे काम महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने हाती घेतले आहे.

बुधवार १ मार्च २०२३ रोजी व दुसऱ्या दिवशी खाली नमूद केलेल्या परिसरातील पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे.

या भागात येणार नाही पाणी

प्रभात रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता, एरंडवणे, नवसह्याद्री सोसायटी, मयुर कॉलनी, डेक्कन परिसर, कोथरुड, संगम प्रेस रोड, करिश्मा सोसायटी, हॅपी कॉलनी, सहवास सोसायटी, कर्वेनगर परिसर, म्हात्रे पुल ते राजाराम पुल, श्रीमान सोसायटी परिसर, मनमोहन सोसायटी परिसर, कर्वे पुतळा परिसर, आयडीयल कॉलनी परिसर, पौड रस्ता, भांडारकर रस्ता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here