अलर्ट! पुण्यात सलग दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

116

पुणे शहरातील जलकेंद्रातील विद्युत व पंपिंग विषयक कामांबरोबरच टाक्या व जलवाहिन्यांची कामे करावयाची असल्याने, येत्या गुरुवारी (दि. २५ ऑगस्ट) शहरातील बहुतांश भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवार २६ ऑगस्ट रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

( हेही वाचा : जागतिक वडापाव दिन : मुंबईची ओळख ते दुबईत २ हजाराला मिळणारा सोन्याचा वडापाव; ‘जगात भारी’ वडापावची गोष्ट )

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वारजे जलकेंद्र व अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, वारजे जीएसआर टाकी परिसर, एसएनडीटी, स्वारगेट पाणी पुरवठा विभाग अखत्यारीतील पर्वती एमआयआर टाकी परिसर तसेच नवीन व जुने होळकर जलकेंद्र, चतुश्रुंगी टाकी परिसर येथील विद्युत/ पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक कामांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

या भागात पाणीपुरवठा बंद 

  • वारजे जलकेंद्र व टाकी परिसर – पाषाण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, मधूवन सोसायटी, बावधन परिसर, भुसारी कॉलनी, चिंतामणी सोसायटी, गुरूगणेश नगर, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, बालेवाडी, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, सुस रोड इत्यादी.
  • वारजे जलकेंद्र अखत्यारीतील गांधी भवन टाकी परिसर.
  • एसएनडीटी ( एच.एल. आर व एम.एल. आर.)
  • पर्वती एमएलआर टाकी परिसर.
  • चतुश्रृंगी टाकी परिसर.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.