वारजे येथील जलकेंद्राच्या अंतर्गत महावितरणला विद्युत विषयक कामे करायची असल्याने गुरुवार ६ ऑक्टोबरला संपूर्ण कोथरूड, पाषाण, बाणेर, बावधन, बालेवाडी व वारजे या भागातील पाणी पुरवठा बंद असणार आहे. शुक्रवारी ७ ऑक्टोबरला उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात होईल. महापालिकेतर्फे वारजे येथील एचएलआर व एमएलआर टाकी परिसर, स्वारगेट पाणी पुरवठा विभाग अखत्यारीतील पर्वती एचएलआर टाकी परिसर तसेच नवीन व जुने होळकर जलकेंद्र, चतुःशृंगी टाकी परिसर येथील विद्युत पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीच्या देखभाल दुरुस्ती कामांचे नियोजन असल्याने पाणी पुरवठा बंद असणार आहे.
( हेही वाचा : उत्तराखंडमध्ये हिमस्खलन! २८ प्रशिक्षणार्थी गिर्यारोहक अडकले; बचावकार्य सुरू )
कोथरूड, बाणेरचा पाणी पुरवठा गुरुवारी राहणार बंद
वारजे जलकेंद्र येथे उच्चदाब स्वीचगिअरमधून आवाज येत असल्याने त्याचा परिणाम अन्य वाहिन्यांवरही होत आहे. याची दुरुस्ती तातडीने करणे आवश्यक आहे, त्यामुळे महावितरणने त्याबाबत महापालिकेला विनंती केली. त्यानुसार गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.
या भागात पाणी पुरवठा बंद
वारजे जलकेंद्र अखत्यारीत चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर – पाषाण साठवण टाकी, भूगाव रस्ता परिसर, कोकाटे वस्ती, सेंटिन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरजनगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, संपूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लमाणतांडा, मोहननगर, सूस रस्ता इत्यादी.
Join Our WhatsApp Community