पश्चिम उपनगरांतील ‘या’ भागांत ६ आणि ७ ऑक्टोबरला पाणीकपात

त्यामुळे या काळात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.

जोगेश्वरी (पूर्व) येथे महाकाली गुंफा मार्गावर नंदभवन इंडस्ट्रीज् जवळ १२०० मिलीमीटर व्यासाच्या वर्सोवा आऊटलेट या जलवाहिनीवरील गळती रोखण्याचे काम बुधवारी ६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते  गुरुवारी ७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० पर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व व पश्चिम भागातील काही परिसरात पाणीपुरवठा होणार नाही, तर काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

गळती दुरुस्तीचे काम

मुंबई महापालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. या गळती दुरुतीचे काम तातडीने हाती घेणे आवश्यक होते. त्यामुळे येत्या बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून ते गुरुवारी सकाळी दहा वाजेपर्यंत महापालिकेच्या के/पूर्व आणि के/पश्चिम विभागातील पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात येत आहे. त्यामुळे या काळात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.

(हेही वाचाः मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा… ‘या’ दिवशी पाणी येणार नाही)

पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित राहणारे परिसर व पाणीपुरवठा कमी दाबाने होणारे परिसर यांबाबतची माहिती- 

 

(हेही वाचाः मुंबईतील दूषित पाण्याचा टक्का वाढला, पण हे विभाग झाले दूषित पाणीमुक्त)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here