मुंबईत ‘या’ भागांमध्ये पाणीकपात! कधी? वाचा

कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका जलअभियंता विभागाने केले आहे.

133

मुंबई महापालिकेतर्फे मुंबई शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या भांडुप संकुल येथील १ हजार ९१० दशलक्ष उदंचन केंद्रात दोन १२०० मिलीमीटर व्यासाच्या स्लुईस झडपा बदलण्याचे काम, तसेच पिसे-पांजरापोर संकुलातील तिसऱ्या टप्प्याच्या उदंचन केंद्रातील एक नादुरुस्त पंप काढून त्या ठिकाणी राखीव उदंचन संच बसवण्याचे काम येत्या मंगळवारी २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता हाती घेण्यात येईल. हे काम रात्री १० वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या कालावधीत मुंबई महानगरातील पूर्व व पश्चिम उपनगरे आणि शहर विभागातील सर्व भागातील पाणीपुरवठ्यात सुमारे १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.

(हेही वाचाः मुंबईतील दूषित पाण्याचा टक्का वाढला, पण हे विभाग झाले दूषित पाणीमुक्त)

याशिवाय, पवई येथे १८०० मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व व तानसा पश्चिम जलवाहिनीवरील गळती रोखण्याचे कामही मंगळवारी २६ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता हाती घेण्यात येईल. हे काम बुधवारी सकाळी १० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या कालावधीतही मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून ते बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत विलेपार्ले-जोगेश्वरी पूर्व, भांडुप, कांजूर, विक्रोळी, धारावी व वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व आदी भागांमधील पाणीपुरवठ्यात १०० टक्के कपात करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

या कालावधीतील पाणीकपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक तितका साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका जलअभियंता विभागाने केले आहे.

(हेही वाचाः फॉरेन टूरचा विचार करताय? मग वाचा कोणत्या देशांमध्ये कसे आहेत नवे नियम)

या भागांत होणार कपात

  • महापालिका एस विभाग: फिल्टरपाडा एस एक्स-०६-(२४ तास कपात)- जयभिम नगर, बेस्ट नगर, आरे मार्ग आणि परिसर, फिल्टरपाडा
  • महापालिका के/पूर्व विभाग: मरोळ बस बार क्षेत्र, केई ०१- (दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कपात)- चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत (भाग), चरत सिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, नवपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदीर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांती नगर
  • महापालिका के/पूर्व विभाग: – सहार रोड क्षेत्र, केई ०१- (दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कपात) – कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍण्ड टी वसाहत
  • महापालिका के/पूर्व विभाग: ओम नगर क्षेत्र, केई ०२– (पहाटे ४ ते सकाळी ८ वाजेपर्यंत कपात) – ओम नगर, कांती नगर, राजस्थान सोसायटी, साईनगर (तांत्रिक क्षेत्र), सहार गाव, सुतार पाखडी (पाईपलाईन क्षेत्र)
  • महापालिका के/पूर्व विभाग: एम. आय. डी. सी. व भवानी नगर केई १०- (सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत कपात) – मुलगाव डोंगरी, सुभाष नगर, एम. आय. डी. सी. मार्ग क्रमांक १ ते २३, भंगारवाडी, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडीविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गा पाडा, मामा गॅरेज
  • महापालिका के/पूर्व विभाग: विजय नगर मरोळ क्षेत्र, केई -१०ए-(सायंकाळी ६ ते रात्री १०.०० वाजेपर्यंत कपात)- विजय नगर मरोळ, मिलीट्री मार्ग, वसंत ओआसिस, गांवदेवी, मरोळ गांव, चर्च रोड, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा
  • महापालिका के/पूर्व विभाग: सिप्झ, तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ (२४ तास कपात)
  • महापालिका एच/पूर्व विभाग: बांद्रा टर्मिनल पुरवठा क्षेत्र
  • महापालिका जी/उत्तर विभागः धारावी सायंकाळचे पाणीपुरवठा क्षेत्र- (दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत कपात) – धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदीर मार्ग, ए. के. जी. नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, संत गोराकुंभार मार्ग
  • महापालिका जी/उत्तर विभाग: धारावी सकाळचे पाणीपुरवठा क्षेत्र– (पहाटे ४ ते दुपारी १२ वाजेपर्यंत कपात) – प्रेम नगर, नाईक नगर, जास्मिन मील मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, ९० फीट रोड, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, संत रोहिदास मार्ग
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.