मुंबई पांजरापूर संकुलातील मुंबई-३अ उदंचन केंद्रामध्ये ९०० मिलीमीटर व्यासाची झडप बसवण्याच्या कामासाठी गुरुवार २६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून शुक्रवार २७ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत असे एकूण २४ तासांसाठी हे उदंचन केंद्र बंद राहणार आहे. या कारणाने या कालावधीत पश्चिम उपनगरे, शहर भागातील लालबाग ते शीव वगळून सर्व विभाग तर पूर्व उपनगरातील कुर्ला व घाटकोपर विभागात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
२४ तास पाणीकपात
मुंबई शहर, पश्चिम उपनगरे व पूर्व उपनगरातील काही विभागांचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून मुंबई महापालिकेतर्फे पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर येथील मुंबई-३अ उदंचन केंद्रामध्ये ८० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा एक नवीन उदंचन संच बसवण्यात येणार आहे. हा उदंचन संच बसवण्यापूर्वी ९०० मिलीमिटर व्यासाची एक नवीन झडप बसवण्यात येणार आहे. त्यामुळे पांजरापूर येथील मुंबई-३अ उदंचन केंद्र हे गुरुवार २६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८ पासून शुक्रवार २७ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. परिणामी भांडुप संकुलास होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये सुमारे १० टक्के पाणी कपात होईल.
(हेही वाचाः खुशखबर! मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव, धरणे भरली!)
महापालिकेचे आवाहन
या कारणाने, या कालावधीत भांडुप संकुलाद्वारे होणाऱ्या पश्चिम उपनगरे, तसेच शहर भागातील एफ/दक्षिण व एफ/उत्तर वगळून सर्व विभाग तर पूर्व उपनगरातील एल व एन विभागात होणा-या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. या कालावधीतील पाणी कपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक तितका साठा करुन ठेवावा. तसेच, पाणी कपातीच्या काळात काटकसरीने पाणी वापरुन महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community