सोमवार आणि मंगळवारी उपनगरांतील या भागात पाणीकपात

88

मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मालाड (पश्चिम) विभागातील मालवणी प्रवेशद्वार क्रमांक १ माधील राधाकृष्ण हॉटेल समोर मार्वे मार्ग येथे नव्याने टाकण्यात आलेल्या ७५० मिलीमीटर व अस्तित्वात असलेल्या ६०० मिलीमीटर व्यासांच्या जलवाहिन्यांच्या जोडणीचे काम हाती घेण्यात येणारआहे. तसेच ६०० मिलीमीटर मध्यवर्ती झडप बसविण्याचे काम येत्या सोमवारी १७ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री १० वाजता हाती घेण्यात येणा आहे. या जलवाहिनी जोडणीच व नव्याने झडपा बसवण्याचे काम मंगळवारी १८ ऑक्टोबरपर्यंत रात्री दहा वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून या कालावधीमध्ये या परिसरातील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

( हेही वाचा : गोरेगाव मुलुंड लिंक रोडच्या कामांवर ‘आयआयटी’ची नजर)

या जलवाहिनीच्या जोडणीचे काम झडपा बसवण्याच्या कामाच्या कालावधीमध्ये अर्थात सोमवार, १७ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री दहा वाजल्यापासून मंगळवार, १८ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री १० वाजेपर्यंत मालाड (पश्चिम) विभागातील मढ, मालवणी, जनकल्याण नगर, मनोरी, गोराई तसेच कांदिवली (पश्चिम) या विभागातील छत्रपती शिवाजी महाराज संकुल आणि न्यू म्हाडा परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील,असे महापालिका जलअभियंता विभागाने स्पष्ट केले आहे.

या जलजोडणीच्या कामांच्या कालावधीमध्ये पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याने या कपातीच्या काळात या भागातील नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा आणि पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा असे आवाहन जलअभियंता विभागाने केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.