शहर विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याकरिता जुन्या व जीर्ण जलवाहिनींच्या बळकटीकरणाची कार्यवाही सुरू आहे. या अंतर्गत ‘जी दक्षिण’ विभागात रेसकोर्स येथे प्रत्येकी १ हजार ४५० व्यासाच्या तानसा (पूर्व) व तानसा (पश्चिम) या प्रमुख जलवाहिन्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. गुरूवारी ०६ जून २०२४ रोजी रात्री ०९. ४५ वाजल्यापासून ते शुक्रवारी ०७ जून २०२४ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत म्हणजेच एकूण १७ तास १५ मिनिटे हे दुरूस्तीत काम सुरू राहणार आहे. (Water cut)
(हेही वाचा – POK पाकिस्तानचा भाग नाही; इस्लामाबाद हायकोर्टात पाक सरकारने केला खुलासा)
या दुरुस्ती कालावधीत म्हणजेच गुरूवारी ०६ जून २०२४ रोजी रात्री ०९.४५ वाजल्यापासून शुक्रवारी ०७ जून २०२४ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत (१७ तास १५ मिनिटे) जी दक्षिण विभागातील करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, डिलाईल मार्ग, बीडीडी चाळ, लोअर परळ या परिसरांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. (Water cut)
संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे महानगरपालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे. (Water cut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community