- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागातील सेनापती बापट मार्ग येथे तानसा (पूर्व) १,४५० मिलीमीटर व्यासाच्या प्रमुख जलवाहिनीच्या दुरुस्ती काम हाती घेण्यात येणार आहे. गुरुवारी २६ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी २७ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान एकूण १९ तासांसाठी दुरुस्ती काम केले जाणार आहे. त्यामुळे, या कालावधी दरम्यान जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर काही भागांमध्ये पाणीपुरवठा अंशत: बंद राहणार आहे.
संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. (Water Cut)
(हेही वाचा – आधी विरोधक म्हणायचे Akshay Shinde ला लगेच फाशी द्या; मग आता का ओरडत आहेत?; अजित पवारांचा संताप)
कोणत्या भागांत कधी होणार पाणीकपात
जी दक्षिण –
करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, लोअर परळ, डिलाईल मार्ग, बी. डी. डी. चाळ (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ – पहाटे ४.३० ते सकाळी ७.४५ वा.) पाणीपुरवठा बंद राहील.
जी दक्षिण –
एन. एम. जोशी मार्ग, बी. डी. डी. चाळ (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ – दुपारी २.३० ते दुपारी ३.०० वा.) पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)
(हेही वाचा – NetFlix India : नेटफ्लिक्स इंडियावर कर चुकवेगिरी आणि वांशिक भेदभावाचे आरोप, काय आहे प्रकरण?)
जी दक्षिण –
संपूर्ण प्रभादेवी, आदर्श नगर, पी. बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, मराठे मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, एन. एम. जोशी मार्ग, गणपतराव कदम मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ – दुपारी ४.०० ते सायंकाळी ७.०० वा.) अंशतः (३३ टक्के) पाणीपुरवठा बंद राहील.
जी उत्तर –
सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाङगीळ मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ – दुपारी ४.०० ते सायंकाळी ७.०० वा.) अंशतः (३३ टक्के) पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community