Water Cut : पश्चिम उपनगरातील ‘या’ भागात राहणार पाणीबाणी; १६ तासांचा वॉटर ब्लॉक

पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ४ ते ५ दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्‍यात येत आहे.

3550
Water Cut : पश्चिम उपनगरातील 'या' भागात राहणार पाणीबाणी; १६ तासांचा वॉटर ब्लॉक

मुंबई महानगरपालिकेतर्फे के पूर्व विभागात अंधेरी (पूर्व) येथील ‘बी. डी. सावंत मार्ग व कार्डिनल ग्रेसिअस मार्ग जंक्शन ते कार्डिनल ग्रेसिअस मार्ग व सहार मार्ग जंक्शन येथे प्रत्येकी १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आणि नवीन १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (पार्ले आऊटलेट) या दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्याचे व जुनी नादुरुस्त १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी काढून टाकण्याचे काम बुधवारी २२ मे २०२४ रोजी सकाळी ९ वाजेपासून गुरुवार, दिनांक २३ मे २०२४ रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत (१६ तास) हाती घेण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर वेरावली जलाशय १, २, ३ ची पाण्याची पातळी सुधारेल व त्यामुळे अंधेरी (पूर्व) व (पश्चिम), जोगेश्वरी (पूर्व) व (पश्चिम), विलेपार्ले (पूर्व) व (पश्चिम) या भागांच्या पाणीपुरवठ्यामध्ये कायमस्वरुपी सुधारणा होणार आहे. (Water Cut)

या दुरुस्ती कालावधीत म्हणजे बुधवारी २२ मे २०२४ रोजी सकाळी ९ वाजेपासून गुरुवार, दिनांक २३ मे २०२४ रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत (१६ तास) के पूर्व, के पश्चिम व पी दक्षिण विभागातील खालील नमूद केलेल्या परिसरांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या संबंधित परिसरातील नागरिकांनी कृपया पाणी जपून व काटकसरीने वापरावे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ४ ते ५ दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्‍यात येत आहे. (Water Cut)

(हेही वाचा – भाषणाच्या वेळी नेत्यांनी संयत भाषा वापरावी; Election Commission च्या सूचना)

या भागात राहणार पाणीपुरवठा बंद तथा कपात

के पूर्व विभाग  : त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर कॉलनी मातोश्री क्लब, दुर्गा नगर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ८.०० ते सकाळी १०.००) – सकाळी ८.०० ते सकाळी ९.०० वाजेदरम्यान पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)

के पूर्व विभाग : दुर्गा नगर, सारीपुत नगर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी १०.०० ते दुपारी १२.००) – पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)

के पूर्व विभाग : दत्त टेकडी, ओबेराय स्प्लेंडर, केलती पाडा, गणेश मंदीर परिसर जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता (JVLR) (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ९.०० ते सकाळी ११.००) – पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)

के पूर्व विभाग : बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानीपाडा, सुभाष मार्ग, चाचानगर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ११.०० ते दुपारी २.००) – पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)

के पूर्व विभाग : वांद्रे भूखंड, हरी नगर, शिवाजी नगर, पास्कल वसाहत, शंकरवाडी (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १.३० ते दुपारी ३.४०) – पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)

के पूर्व विभाग : विशाल सभागृह, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकरवाडी, बिमा नगर, पंथकी बाग, तेली गल्ली, हाजी जुमान चाळ, कोळ डोंगरी, जीवा महाले मार्ग, साई वाडी, जीवन विकास केंद्र, शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान नगर, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्री नगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, विलेपार्लेचा बहुतांश भाग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५.०० ते रात्री ८.००) – पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)

के पूर्व विभाग : पंप हाउस, विजय राउत मार्ग, पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली हिल, आशीर्वाद चाळ (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५.०० ते रात्री ८.००) – पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)

के पूर्व विभाग : जुना नागरदास मार्ग, मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग मार्ग, निकोलसवाडी परिसर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री ८.०० ते रात्री १०.३०) – पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)

पी दक्षिण विभा : बिंबीसार नगर, बांद्रेकरवाडी, वनराई, राज्य राखीव पोलीस दल (SRPF) परिसर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.०० ते रात्री ९.३०) – पाणीपुरवठा कमी दाबाने राहील. (Water Cut)

पी दक्षिण विभाग : राम मंदीर मार्ग, गोरेगाव (पश्चिम) (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.४५ ते रात्री ९.१५) – पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)

के पश्चिम विभाग : सी. डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय गल्ली, स्वामी विवेकानंद मार्ग अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकुशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी बाजार, भर्डावाडी, आंब्रे गार्डन पंप (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी १२.००) – पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)

के पश्चिम विभाग : जुहू-कोळीवाडा, जुहू तारा मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ९.०० ते सकाळी ११.०० जुहू-कोळीवाडा झोन के पश्चिम – ११) – पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)

के पश्चिम विभाग : देवराज चाळ, स्वामी विवेकानंद मार्ग (JVLR ते जोगेश्वरी बस आगार) (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ११.०० ते दुपारी १.०० एस. व्ही. मार्ग जोगेश्वरी भाग – २ – के पश्चिम ०१) – पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)

के पश्चिम विभाग : चार बंगला, डी. एन. नगर, जुहू-वेसावे जोडरस्ता (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १२.१५ ते दुपारी २.१० चार बंगला झोन – के पश्चिम – ०७) – पाणीपुरवठा कमी दाबाने राहील. (Water Cut)

के पश्चिम विभाग : विलेपार्ले (पश्चिम), लल्लूभाई पार्क, लोहिया नगर, विलेपार्ले गावठाण, मिलन सबवे, संपूर्ण जुहू परिसर, व्ही. एम. मार्ग, नेहरू नगर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.३० ते सायंकाळी ४.३० विलेपार्ले झोन – के पश्चिम ०९) – पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)

के पश्चिम विभाग : मोरागाव, जुहू गावठाण (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.३० ते सायंकाळी ४.४० मोरागाव झोन – के पश्चिम ०८) – पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)

के पश्चिम विभाग : यादव नगर, सहकार मार्ग, बांदिवली हिल, मोमीन नगर, खजूरवाडी, जोगेश्वरी फाटक, जोगेश्वरी स्थानक मार्ग, कॅप्टन सामंत मार्ग (भाग) (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री ९.३० ते रात्री १२.०० यादव नगर – के पश्चिम ०४) – पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)

के पश्चिम विभाग : गिल्बर्ट हिल, सागर सिटी, गावदेवी डोंगरी, जुहू गल्ली, वायरलेस मार्ग, श्रीनाथ नगर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री १०.०० ते मध्यरात्री १२.३० गिल्बर्ट हिल झोन – के पश्चिम ०६) – पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.