महापालिका ए विभागातील जीवन विमा मार्गावर १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी ११ मे २०२४ रोजी दुपारी ३.३० ते रात्री ११.३० या कालावधीत हाती घेण्यात आहे. या दुरुस्तीच्या आठ तासांच्या कालावधीत कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरास होणारा पाणीपुरवठा राहणार बंद राहणार असल्याची माहिती महापालिका जल अभियंता विभागाने दिली आहे. तर नौदलास रात्री होणारा पुरवठा हा दुरुस्तीनंतर म्हणजेच विलंबाने पुरवण्यात येईल. त्यामुळे या संबंधित भागातील नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनास (Municipal Administration) सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. (Water Cut)
महानगरपालिकेच्या ए विभागात पाणीपुरवठा करण्यासाठी क्रॉस मैदान बोगद्यातून १५०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीद्वारे पुढे १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा उपयोग केला जातो. या जलवाहिनीवरुन होणारा पुरवठा हा कमी दाबाने तसेच कमी प्रमाणात होत असल्याचे आढळल्यानंतर शोध घेण्यात आला. त्यावेळी, मंत्रालय इमारतीजवळ जीवन विमा मार्ग येथे मेट्रो ३ चे काम सुरू असताना या १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीस गळती झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महानगरपालिकेच्या तातडीच्या दुरूस्ती विभागाने घटनास्थळी पाहणी केली. सदर जलवाहिनीची ही गळती लवकरात लवकर दुरुस्त करावी लागणार आहे, अन्यथा गळतीमुळे पाणी वाया जाण्यासह रस्ता खचण्याचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. सदर गळतीच्या दुरूस्तीसाठी सुमारे ७ ते ८ तासांचे अलगीकरण करावे लागणार आहे. (Water Cut)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: शिरूरच्या सभेत Ajit Pawar यांचा अमोल कोल्हेंवर हल्लाबोल)
या सर्व बाबी लक्षात घेता, तसेच मंत्रालय व मरीन ड्राइव्ह हा परिसर आत्यंतिक महत्त्वाचा असल्याने महानगरपालिकेने मरीन ड्राइव्ह वाहतूक पोलिसांशी तातडीने संपर्क साधून या दुरुस्ती कामाचे प्राधान्य कळवले आहे. त्यानुसार वाहतुकीचे नियोजन होण्याच्या दृष्टीने दुरुस्ती कामाची परवानगी घेतली आहे. मरीन ड्राइव्ह वाहतूक पोलिसांनी शनिवारी ११ मे २०२४ रोजी सदर जलवाहिनीच्या दुरूस्तीस परवानगी दिली आहे. त्यानुसार, महानगरपालिकेच्या जल अभियंता खाते अंतर्गत तातडीच्या दुरूस्ती विभागाने (ईआरसी) शनिवार, दिनांक ११ मे २०२४ रोजी दुपारी ३.३० ते रात्री ११.३० या ८ तासांच्या कालावधीत दुरूस्ती कामे हाती घेण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी सकाळी ९ वाजेपासून खोदकाम सुरु केले जाईल. तर जलवाहिनीतील पाणी उपसा करुन नंतर प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम दुपारी ३.३० वाजेपासून केले जाईल. तोवर संबंधित भागातील सकाळ व दुपार सत्रातील पाणीपुरवठा दिला जाईल. (Water Cut)
दुपारी ३.३० ते रात्री ११.३० या ८ तासांच्या प्रत्यक्ष दुरुस्ती कालावधीत कुलाबा (नियमित पाणीपुरवठा वेळ- सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ६.३०), कोळीवाडा अतिरिक्त विशेष पाणीपुरवठा वेळ- सायंकाळी ६.३० ते सायंकाळी ६.४५ आणि नौदल अतिरिक्त विशेष पाणीपुरवठा वेळ– ६.५० ते सायंकाळी ७.०५ या परिसरांना होणारा पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहणार आहे. तसेच, नौदलास रात्री १०.३० ते पहाटे २.५० या कालावधीत केला जाणारा नियमित पाणीपुरवठा हा दुरूस्ती काम पूर्ण झाल्यानंतर, जलवाहिन्या भारीत (चार्जिंग) करुन त्यानंतर म्हणजेच नियमित पाणीपुरवठ्याच्या तुलनेत विलंबाने होईल, असे महानगरपालिकेच्यावतीने कळविण्यात येत आहे. (Water Cut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community