-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
घाटकोपर (पश्चिम) येथील भटवाडी परिसरात आर. बी. कदम मार्ग नजीकच्या घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक ०२ ची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. सोमवारी १७ मार्च २०२५ पासून संरचनात्मक दुरुस्ती केलेल्या कप्पा क्रमांक ०२ मधून पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसरातील नागरिकांनी सोमवार, दिनांक १७ मार्च २०२५ पासून पुढील १० दिवस म्हणजे गुरुवार, २७ मार्च २०२५ पर्यंत पाणी उकळून व गाळून प्यावे, अशी विनंती मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. (Water)
दुरुस्तीचे काम केल्याने पुढील काही दिवस यातून होणारा पाणीपुरवठा गढूळ सदृश्य येण्याची शक्यता असते. त्यामुळे हे गढूळ पाणी येते म्हणून घाबरून जाण्याचे कारण नसून नागरिकांना जर पाणी गाळून आणि उकळून प्यायल्यास योग्य ठरेल असे जलअभियंता विभागाच्या अभियंत्याचे म्हणणे आहे. दरम्यान, घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक दोनची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर आता कप्पा क्रमांक एकची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. (Water)
(हेही वाचा – केरळमधून क्रिप्टो करन्सीचा सूत्रधार Alexei Beshokov याला अटक)
या भागातील नागरिकांना प्यावे लागणार पाणी उकळून
नारायणनगर – चिराग नगर, आझाद नगर, गणेश मैदान, पारशीवाडी, नवीन माणिकलाल वसाहत, एन. एस. एस. मार्ग, महिंद्रा उद्यान (पार्क), डी. एस. मार्ग, खलई गाव, किरोल गाव, विद्याविहार (पश्चिम), हंसोटी गल्ली, खोत गल्ली, एम. के गांधी मार्ग, नौरोजी गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, कामा गल्ली, श्रद्धानंद मार्ग, जे. व्ही. मार्ग, गोपाळ गल्ली, जीवदया गल्ली, गीगावाडी. (Water)
पंतनगर आउटलेट – भीम नगर, पवार चाळ, लोअर भीमनगर, क्राईम ब्रांच परिसर, वैतागवाडी, नित्यानंद नगर, धृवराजसिंग गल्ली मार्ग, सी. जी. एस. वसाहत, गंगावाडी, एम. टी. एन. एल. गल्ली, अंधेरी-घाटकोपर जोडमार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग, घाटकोपर (पश्चिम) लगतचा परिसर, श्रेयस सिग्नल इत्यादी. (Water)
सर्वोदय बुस्टींग – सेनिटोरीयम गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, कामा गल्ली, श्रद्धानंद मार्ग, जे. व्ही. मार्ग, गोपाळ गल्ली, लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर, घाटकोपर (पश्चिम), गांधी नगर. (Water)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community