-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत काही खासगी टँकर चालकांकडून विहीर तसेच कुपनलिकांमधून पाण्याचा पुरवठा केला जात असून हे पाणी (Water) पिण्याव्यतिरिक्त इतर बाबींकरताच वापरणेच आवश्यक असतानाच प्रत्यक्षात वॉटर टँकरवर आरओ वॉटर असा उल्लेख केला जात आहे. त्यामुळे टँकरवर आरओ वॉटर असा उल्लेख करायचा आणि त्याच टँकरमधून विहिरींमधील पाण्याचा पुरवठा करायचा असा प्रकार सुरु आहे. त्यामुळे आरओच्या नावाखाली टँकरमधून विहीर आणि कुपनलिकांमधील पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने एकप्रकरे जनतेची फसवणूक होते का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
(हेही वाचा – थूक जिहादनंतर आता शरबत जिहाद; Baba Ramdev यांनी उल्लेख करताच कट्टरपंथी भडकले)
सध्या अति उष्म्यामुळे पाण्याची (Water) मागणी वाढत असून त्यातच अनेक ठिकाणी जलवाहिनीची गळती आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले जात असल्याने कमी दाबाने तथा अपुरा पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे काही इमारत तथा सोसायटींची पाण्याची गरज भागवण्यासाठी खासगी टँकरद्वारे विहिरींमधील पाण्याची मागणी केली जाते. तसेच काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही मागणी केली जाते. मुंबईमध्ये महापालिकेच्यावतीने पिण्याच्या पाण्याचा (Water) पुरवठा स्वत:च्या मालकीच्या टँकरमधून केला जातो किंवा खासगी टँकरची सेवा घेवून केली जाते. परंतु खासगी विहिरींचे पाणी पिण्याकरता वापरण्यास बंदी असून पिण्याव्यतिरिक्त इतर बाबींकरता वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक टँकरवर पिण्याव्यतिरिक्त वापराचे पाणी (Water) असा उल्लेख करणे बंधनकारक आहे.
(हेही वाचा – केंद्रीय गृहमंत्री Amit Shah शनिवारी रायगड दौऱ्यावर; पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?)
परंतु मुंबईतील अनेक टँकरवर हे पाणी (Water) पिण्याचे आहे असा उल्लेख केला जात आहे. तसेच काही टँकरवर तर आरओ वॉटर असा उल्लेख जात आहे. दादरच्या रानडे मार्गावर ऍक्सिस बँक आणि चितळे एक्सप्रेस दरम्यान श्री स्वामी समर्थ कृपा बिल्डींगच्या परिसरातील विहिरीमधील पाणी भरले जाणाऱ्या एक मिनी टँकररवर चक्क आरओ वॉटर असा उल्लेख केलेला दिसून येत आहे. या वॉटर टँकर चालकांकडे विचारणा केल्यानंतर यात विहिरीचे पाणी (Water) आहे. पण ते पिण्यासाठी नाही असे त्याने स्पष्ट केले. परंतु एका बाजूला याच टँकरमधून जर शुद्धीकरण केलेल्य पाण्याचा पुरवठा होत असेल तर याच टँकरमधून विहिरीतील पाणी वाहून नेल्यास नागरिकांना दुषित पाण्याचा पुरवठा केला जाऊ शकतो. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे अशाप्रकारे जर टँकरवर आर ओ वॉटर असा उल्लेख असेल तर महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याची दखल घेवून यावर पिण्याव्यतिरिक्त अन्य वापराचे पाणी असा उल्लेख करणे बंधनकारक करावे आणि जर उल्लेख नसेल तर संबंधित टँकर चालकांवर दंडात्मक कारवाई करावी असे नागरिकांचे म्हणणे आहे. (Water)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community