मोसमी पाऊस लांबल्यामुळे पाणी टंचाईने रत्नागिरी जिल्ह्यात भीषण रूप धारण केले आहे. जिल्ह्यात १०५ गावांमधील १९८ वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तेथील ३९ हजार ६३७ ग्रामस्थांना २० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाऊस लांबल्यास पाणी टंचाई अधिक रौद्ररूप धारण करण्याची शक्यता आहे.
दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंडणगड तालुक्यात ७ गावांतील १० वाड्यांमध्ये एक हजार ३३९ ग्रामस्थांना एका टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दापोली तालुक्यात ६ गावांतील १६ वाड्यांमध्ये एक हजार ५५० ग्रामस्थांना एका टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
(हेही वाचा – मान्सून लांबल्याने विदर्भातील शेतकरी चिंतेत; ‘या’ तारखेला मान्सून बरसण्याची शक्यता)
इतर तालुक्यांना सुरू असलेल्या पाणीपुरवठ्याची स्थिती अशी…
खेड – ३० गावांतील ५२ वाड्यांमध्ये ४ टँकरने ७ हजार ४६० ग्रामस्थांना पाणीपुरवठा
गुहागर – ५ गावांतील ६ वाड्यांमध्ये एका टँकरने ८५६ ग्रामस्थांना पाणीपुरवठा
चिपळूण – १६ गावांतील २६ वाड्यांमध्ये दोन टँकरने ३ हजार ९५२ ग्रामस्थांना पाणीपुरवठा
संगमेश्वर – ३२ गावांतील ६५ वाड्यांमध्ये ५ टँकरने १२ हजार ४२१ ग्रामस्थांना पाणीपुरवठा
रत्नागिरी – ४ गावांतील १६ वाड्यांमध्ये ५ टँकरने ११ हजार १२५ ग्रामस्थांना पाणीपुरवठा
लांजा – ५ गावांतील ७ वाड्यांमध्ये एका टँकरने ८९४ ग्रामस्थांना
हेही पहा –
Join Our WhatsApp Community