मुंबई विशेष प्रतिनिधी
Water : मुलुंड (Mulund) पश्चिमेकडील टी विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या १८०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर भांडुप पश्चिमेकडील तानसा जलवाहिनी (Tansa Canal) जवळ मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याचे शनिवारी २९ मार्च २०२५ रोजी आढळून आले आहे. या ठिकाणी जलवाहिनी दुरुस्तीचे (Aqueduct repair) काम सहाय्यक अभियंता (जलकामे) परिक्षण पूर्व उपनगरे घाटकोपर यांच्या मार्फत हाती घेण्यात आले आहे. दुरुस्ती काम युद्ध पातळीवर सुरू असून, काम पूर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी अंदाजे १० ते १२ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. जलवाहिनी दुरुस्ती काळात नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. (Water)
(हेही वाचा – Beef : सावंतवाडीत गोवंश मांस वाहतूक करणाऱ्यांना मुसलमानाला हिंदुत्वनिष्ठांनी पकडले; गुन्हा दाखल)
हे होणार बाधित परिसर
टी विभागात (Mulund T Ward) मुलुंड पश्चिमेकडील काही भागात अमर नगर, खिंडीपाडा,जीजीएस मार्गावरील परिसर, मुलुंड कॉलनीचा परिसर, राहुल नगर, शंकर टेकडी, हनुमानपाडा, मलबार हिल रोड, स्वप्ननगरी, घाटीपाडा,बी आर रोड, इत्यादी चा परिसर तसेच एस विभागतील खिंडीपाडा, नजमा नगर येथील आजूबाजूचा विभागात परिणाम होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community