Water logging : …तरीही मुंबईची तुंबई झाली, क्या हुआ तेरा वादा!

1419
Water logging : ...तरीही मुंबईची तुंबई झाली, क्या हुआ तेरा वादा!
Water logging : ...तरीही मुंबईची तुंबई झाली, क्या हुआ तेरा वादा!
विशेष प्रतिनिधी, मुंबई 
मुंबईतील नालेसफाईचे काम पावसाळ्यापूर्वी शंभर टक्के पूर्ण करण्यात आले असून यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत पाणी  तुंबणार नाही हा राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाच्या दावा पुरता फोल ठरला आहे.  रविवारी मध्यरात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामध्ये मुंबईतील अनेक भाग जलमय झाले आणि अनेक ठिकाणी पाणी  साचल्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. याचा परिणाम सोमवारी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर झाला.  रेल्वे सेवा ठप्प झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होता आले नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात ही अवस्था झाल्याने क्या हुवा तेरा वादा असा सवाल महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारला जनतेकडून केला जात आहे. (Water logging)
रविवारी मध्यरात्री एक वाजल्यापासून सकाळी सात पर्यंत पडलेल्या मुसळधार पावसात शहर भागात ८३ टक्के तर दोन्ही उपनगरात ४६७.९ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. शहर भागात गांधी मार्केट, वडाळा स्थानक, हिंदमाता, संगम  नगर, पूर्व उपनगरात असल्फा शेवटचे बस स्थानक, शीतल तलाव, साबळे नगर, नेहरू नगर, कुर्ला रेल्वे स्थानक, कुर्ला सुधा जंक्शन एल. बी एस मार्ग,  कुर्ला सिग्नल, गोवंडी स्टेशन, शेल कॉलनी, विनोबा भावे नगर, गौरी शंकर नगर, घाटकोपर एम जी रोड जंक्शन, घाटकोपर वेलकम हॉटेल, चुनाभट्टी त्रिमूर्ती सोसायटी तसेच पश्चिम उपनगरातील अंधेरी , खार  मिलन आणि मालाड सब वे, एयर इंडिया कॉलनी, अंधेरी पूर्व आकृती मॉल, अंधेरी मार्केट, गुलमोहर इर्ला जंक्शन, नेताजी पालकर रोड, मालवणी बस डेपो, बोरीवली पूर्व आदी परीसरात पाणी तुंबले होते. मात्र, मध्यरात्र असल्याने याचा परिणाम रात्री  जाणवला नसला तरी सकाळी याचा परिणाम रेल्वे सेवेवर झाला. (Water logging)
Untitled design 5
विशेष म्हणजे जिथे जिथे पाणी तुंबते, त्या भागाचा निचरा व्हावा म्हणून पंपिंग स्टेशन बनवण्यात आले, टाक्यांची व्यवस्था केली तसेच अधिक पंप बसवण्यात आले, त्याच भागात पाणी तुंबल्याने (Water logging) महापालिकेने केलेल्या नालेसफाईसह विविध कामांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहे. (Water logging)
पहिल्याच पावसात पोलखोल
मुंबईची तुंबई झाली आहे. काल रात्री झालेल्या पावसात पोलखोल झाली आहे. महापालिकेने सांगितलं होतं  की पाणी साचणार नाही आणि तुंबणार नाही. २५० कोटी रुपये खर्च करून मुंबईचं जनजीवन विस्कळित झालं आहे. राज्य सरकारने सुद्धा दावे केलेले आहेत की यंदा मुंबईत पाणी तुंबणार नाही. पण तुम्ही बघा संपूर्ण मुंबई जलमय झाली आहे. कुर्ला, साकीनाका आणि सगळ्या मुंबईतच पाणी साचलं आहे. एकंदरीत असं दिसत आहे की, मुंबईतील करदात्यांची लूट ही महानगरपालिकेत सुरू आहे. (Water logging)
– रवी राजा, माजी विरोधी पक्षनेते – मुंबई महानगर पालिका
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.