Aqueduct Repair : ‘अंधेरी पश्चिम’ परिसरातील जलवाहिनी दुरूस्‍तीचे काम अवघ्‍या ८ तासांत पूर्ण : पाणी पुरवठा सुरळीत

चक्क सात मजल्याच्या इमारतीच्या गच्चीपर्यंत या पाण्याचे कारंजे उडाले होते.

223
Aqueduct Repair : ‘अंधेरी पश्चिम’ परिसरातील जलवाहिनी दुरूस्‍तीचे काम अवघ्‍या ८ तासांत पूर्ण : पाणी पुरवठा सुरळीत
Aqueduct Repair : ‘अंधेरी पश्चिम’ परिसरातील जलवाहिनी दुरूस्‍तीचे काम अवघ्‍या ८ तासांत पूर्ण : पाणी पुरवठा सुरळीत

‘के पश्चिम’ विभाग हद्दीमध्ये, अंधेरी (पश्चिम) येथील आदर्श नगर रस्ता, ट्विंकल अपार्टमेंटसमोर १,२०० मिलीमीटर व्यासाच्‍या जलवाहिनीची लोखंडी झडप (वर्कींग मॅनहोल) बुधवारी दुपारी पावणे तीन वाजताच्‍या सुमारास निखळल्‍याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू गेले होते. चक्क सात मजल्याच्या इमारतीच्या गच्चीपर्यंत या पाण्याचे कारंजे उडाले होते. या घटनेनंतर व्हॉल्व बंद करून महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याच्या आणि ‘के पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी घटनास्‍थळी धाव घेत जलवाहिनी दुरूस्‍तीचे काम तातडीने हाती घेतले. हे दुरूस्तीचे काम तब्‍बल आठ तास अव्‍याहतपणे करत बुधवारी रात्री अकरा वाजता युद्धपातळीवर पूर्ण केले. त्‍यामुळे लोखंडवाला संकुल परिसर, मिल्लत नगर, सरदार वल्लभ भाई पटेल नगर आणि म्हाडा या परिसराचा गुरूवारचा पाणीपुरवठा नियितपणे आणि सुरळीत झाला आहे.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्‍या मार्गदर्शनानुसार कार्यवाही करत तब्‍बल आठ तास अव्‍याहतपणे काम करत बुधवारी रात्री अकरा वाजता जलवाहिनी दुरूस्‍तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले. उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, बुधवारी (दिनांक २३ ऑगस्ट २०२३) दुपारी पावणे तीन वाजण्‍याच्‍या सुमारास आदर्श नगर जलबोगदा ते मिल्‍लत नगर दरम्‍यानची १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आदर्श नगर रस्‍ता येथे फुटली. वेल्‍डींग केलेली लोखंडी झडप (वर्कींग मॅनहोल) निखळल्याने पाणी बाहेर वाहू लागले. त्यानंतर महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याच्या आणि ‘के पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी घटनास्‍थळी तातडीने धाव घेतली.

(हेही वाचा – Transgender : ट्रान्सजेंडरना आरक्षण देण्याचे हायकोर्टाचे निर्देश)

या जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा तात्काळ बंद करुन पाणी गळती त्वरेने थांबवली. त्यानंतर लगेचच जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्‍यात आले. जलवाहिनीतून पाणी उपसा केल्यानंतर वर्कींग मॅनहोल नव्‍याने बसविण्‍यात आले. यानुसार १५ जणांच्‍या चमूने सलग आठ तास कार्य करत जलवाहिनी दुरूस्‍तीचे काम पूर्ण केले. याबाबत अधिक माहिती देताना जल अभियंता (प्र.) पुरुषोत्तम माळवदे यांनी कळविले आहे की, महानगरपालिकेच्या वतीने मुंबईकरांना विनाव्‍यत्यय व नियमितपणे पाणीपुरवठा करण्‍यात येतो. भूमिगत तर काही ठिकाणी उन्‍नत जलवाहिनीद्वारे हा पाणीपुरवठा केला जातो. परंतु, भूमिगत जलवाहिनीस गळती झाल्‍यास, पाणीपुरवठ्याकामी व्‍यत्यय आल्‍यास दुरूस्‍ती कामे करता यावी, यासाठी जलवाहिनीवर काही ठिकाणी वेल्‍डींग करून लोखंडी झडप (वर्कींग मॅनहोल) कार्यान्वित ठेवण्‍यात येते. जेणेकरून अधिकारी-कर्मचाऱ्यांना जलवाहिनीतील बिघाड नेमका कोठे झाला हे समजून दुरूस्‍ती काम करणे शक्‍य असते. काल अंधेरी येथे झालेल्या जलवाहिनीची अशाच प्रकारची झडप निखळल्याने सदर घटना घडली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.