
-
मुंबई, विशेष प्रतिनिधी
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमध्ये सुधारणा करून भूमिगत जलबोगद्यांमध्ये रुपांतर केले जात आहे. त्यानुसार चेंबूरमधील अमर महल ते ट्रॉम्बे जलाशयापर्यंत सुमारे साडेपाच किलोमीटर लांबीचा जलबोगद्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या जलबोगद्याचे काम सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे येत्या सात महिन्यांमध्ये चेंबूर, गोवंडी, देवनार, शिवाजी नगर आदी भागांमधील पाणीपुरवठ्यात मोठी सुधारणा होणार आहे. त्यामुळे या भागांतील पाणी समस्या येत्या काही महिन्यांमध्ये सुटणार असून येथील रहिवाशांना आता धो धो पाणी (Water) मिळणार आहे.
(हेही वाचा – Shivsena UBT मधील आणखी एक मोठा नेता नाराज? कोकणात पुन्हा सुरु झाल्या हालचाली)
बोगदा खोदाई यंत्राद्वारे अमर महल (चेंबूर) ते ट्रॉम्बे उच्चस्तर जलाशयापर्यंत एकूण ५.५० किमी लांबीच्या जलबोगदा खोदाई तसेच आरसीसी अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सध्या स्थितीत भूस्तरावरील जलवाहिन्या टाकण्याचे काम प्रगतीपथावर असून येत्या सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे महापालिका जलअभियंता विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे या जलबोगद्याचे काम पूर्ण होवून प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यानंतर महापालिकेच्या एम पूर्व म्हणजे देवनार, गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द आणि एम पश्चिम विभागातील चेंबूर आदी भागांमधील पाणीपुरवठ्यात सुधारणा होणार आहे. (Water)
(हेही वाचा – Arvind Kejriwal यांच्या अडचणीत वाढ; ‘शीशमहल’च्या भ्रष्टाचाराची होणार चौकशी)
देवनार, गोवंडी, शिवाजी नगरसह चेंबूर भागात सध्या अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होत असून या भागातील पाणी समस्येमुळे नागरिक त्रस्त आहेत. या भागांत पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी असल्या तरी योग्य दाबाने पाण्याचा पुरवठा करण्यात अडचणी येतात. त्यामुळे जलबोगदा तयार झाल्यानंतर या भागाला अधिक दाबाने पाण्याचा पुरवठा केला जाऊ शकतो, परिणामी या भागातील पाणी (Water) समस्या मोठ्याप्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असे जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
(हेही वाचा – I.N.D.I. Alliance : काँग्रेस-तृणमूलमध्ये दुरावा वाढणार)
कुर्ला ते भायखळापर्यंतच्या पाणीपुरवठ्यात एप्रिल २०२६ पर्यंत सुधारणा
मुंबईर् महापालिकेने हेगडेवार उद्यान चेंबूर अमरमहल ते प्रतीक्षा नगर आणि पुढे सदाकांत ढवण उद्यान या परेल पर्यंतच्या जलबोगद्याचे काम मागील काही वर्षांपासून हाती घेण्यात आले असून हे काम येत्या एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण अपेक्षित असल्याचे जलअभियंता विभागाने स्पष्ट केले. एकूण ९.७ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे काम पूर्ण झाले असून पहिल्या टप्प्यात अमरमहल ते प्रतीक्षा नगर शीव वडाळापर्यंतच्या अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे, दुसऱ्या टपप्यात प्रतीक्षा नगर ते परेल पर्यंतचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम एप्रिल २०२६ रोजी पूर्ण होवून प्रत्यक्षात या जलबोगद्यातून पाणीपुरवठा झाल्यास याचा लाभ महापालिकेच्या एल विभागातील कुर्ला, चुनाभट्टी, एफ उत्तर या विभागातील शीव ते वडाळा आणि एफ दक्षिण विभागातील परळ ते लालबाग आणि ई विभागातील भायखळा आदी विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होणार आहे. (Water)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community