शीव-माटुंगा परिसरात मागील काही दिवसांपासून कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत असून काही भागांमध्ये पाणीही येत नाही. स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाकडून कोणतेही ठोस उत्तर देण्यात आले नाही. म्हणून बुधवारीही यावर समस्येवर तोडगा काढण्यात न आल्याने शीव-माटुंगा परिसरातील स्थानिक नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी एफ-उत्तर विभागावर मोर्चा नेत आंदोलन केले.
पाण्याचा हंडा भेट देऊन तीव्र निषेध
विभागातील जनतेच्या घरांमध्ये पाणी येत नसल्याने दिवाळीला त्यांनी अभ्यंगस्थान कसा करायचा असा सवाल करत त्यांनी विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी रिकामा पाण्याचा हंडा प्रतिकात्मक भेट देत या मानवनिर्मित पाणी टंचाईचा तीव्र निषेध व्यक्त केला. सायन-माटुंगा येथील प्रभाग १७२मध्ये मागील अनेक दिवसांपासून काही ठिकाणी पाणी येत नाही, तर काही ठिकाणी कमी पाणी येते तसेच काही ठिकाणी कमी दाबाचा कमी वेळ पाणी येते. त्यामुळे ऐन दिवाळीच्या सणात पाणी नसल्याने त्यांना लोकांना पाण्यासाठी टँकरमागे रांगा लावून पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीचा संताप पसरला आहे.
ठोस आश्वासन न दिल्यास मोर्चा काढणार
या भागातील पाणी समस्येबाबत स्थानिक नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत आवाज फोडण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी बोलतांना त्यांनी, विभागात १५ ते २० टक्के पाणी कपात असल्याचे सांगितले. या विभागात दोन ते अडीच तास पाणी पुरवठा होवूनही लोकांच्या घरच्या पाण्याच्या टाक्या, तसेच ड्रम भरले जात नाही. त्यामुळे या बैठकीत जर प्रशासनाने जर ठोस आश्वासन न दिल्यास विभाग कार्यालयावर मोर्चा काढला जाईल, असा इशारा दिला होता.
(हेही वाचा- मुंबईकरांनो, वाचा कोरोना लसीकरणासंदर्भात महत्वाची बातमी)
तक्रारी लिखित स्वरुपात रिकाम्या हंड्यात केल्या गोळा
त्यानुसार शिरवडकर यांनी एफ/उत्तर विभाग कार्यालयावर मोर्चा काढत सहायक आयुक्तांना निवेदन दिले. नागरिकांकडून पाणी कमी येत असलेल्या तक्रारीचे निवेदनच स्थानिक नगरसेविका राजेश्री राजेश शिरवडकर सहायक आयुक्तांना दिले. या ‘हंडाभर निवेदन आंदोलन’मध्ये जनते कडून प्राप्त पाण्याच्या तक्रारी लिखित स्वरुपात रिकाम्या हंड्यात गोळा करून त्या हंडाभर तक्रारी सहाय्यक आयुक्त यांना दिल्या. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर, मंडल अध्यक्ष संतोष गुप्ता, महिला जिल्हा महामंत्री प्रीती जयस्वाल, वॉर्ड अध्यक्ष वैभव वोरा, महिला अध्यक्ष भारती रानपुरा, युवा अध्यक्ष केतन तेलंगे, व विभागातील असंख्य महिला उपस्थित होत्या. जर यानंतरही विभागातील पाणी सुटली नाही आणि विभागातील जनतेला दिवाळीच्या सणात पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागल्यास वेगळ्या मार्गाने आंदोलन केले जाईल असाही इशारा राजेश्री शिरवडकर यांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community