Water Reduction: पूर्व उपनगरातील ‘या’ भागात येत्या बुधवार, गुरुवारी पाणी कपात

वाशी नाका येथे जलवाहिनी जोडणी कामामुळे बुधवारी  २९ मे २०२४ रोजी सकाळी १० वाजेपासून गुरुवारी ३० मे २०२४ रोजी सकाळी १० वाजे दरम्यान २४ तासांच्या कालावधीत एम पूर्व व एम पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद

163
Water Reduction: पूर्व उपनगरातील 'या' चार भागात येत्या बुधवार, गुरुवारी पाणी कपात
विशेष प्रतिनिधी मुंबई
मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) बुधवार, दिनांक २९ मे २०२४ ते गुरुवार, ३० मे २०२४ दरम्यान बी. डी. पाटील मार्ग, वाशी नाका येथे ४५० मिलीमीटर व ७५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे एम पूर्व (M East) आणि एम पश्चिम (M West) विभागातील काही भागांना बुधवारी २९ मे २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून गुरुवारी ३० मे २०२४ सकाळी १०.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्‍याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्‍यात येत आहे. (Water Reduction)
(हेही वाचा – Swati Maliwal मारहाण प्रकरणी विभव कुमार यांचा जामीन अर्ज फेटाळला)
एम पूर्व विभाग :
लक्ष्मी वसाहत, राणे चाळ, नित्यानंद बाग, तोलाराम वसाहत, श्रीराम नगर, जे. जे. वाडी, शेठ हाइट्स, डोंगरे पार्क, टाटा वसाहत, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बी. पी. सी. एल.) वसाहत, एच. पी. सी. एल. वसाहत, गवाणपाडा, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एच. पी. सी. एल.) रिफायनरी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, टाटा पॉवर थर्मल प्लांट, बी. ए. आर. सी., वरुण बेवरेजेस *(बुधवारी २९.०५.२०२४  रोजी सकाळी १०.०० ते गुरुवारी ३०.०५.२०२४ सकाळी १०.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील). (Water Reduction)
(हेही वाचा – काँग्रेस 40 जागा आणि अखिलेश बाबू 4 जागांच्या पार जाणार नाहीत; Amit Shah यांचा विश्वास)
एम पश्चिम विभाग 
माहुलगाव, आंबापाडा, जिजामाता नगर, वाशी नाका मैसूर वसाहत, खाडी मशीन, आर. सी. मार्ग, शहाजी नगर, कलेक्टर वसाहत, सिंधी वसाहत, लालडोंगर, सुभाषचंद्र बोस नगर, नवजीवन सोसायटी, ओल्ड बराक चेंबूर छावणी  (बुधवारी २९.०५.२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून गुरुवारी ३०.०५.२०२४ सकाळी १०.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील). (Water Reduction)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.