मुंबई महानगरपालिकेतर्फे (BMC) शुक्रवार, १६ फेब्रुवारी २०२४ ते शनिवार, १७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये पाली हिल जलाशयाच्या (Pali Hill Reservoir) मुख्य जलवाहिनीवर ६०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविण्याचे काम हाती घेण्यात येत असून यादरम्यान वांद्रे, खार पश्चिम भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे या कालावधीत पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन महापालिका जल अभियंता विभागाने केले आहे. (Water Cut)
(हेही वाचा – BMC : मुंबईकरांना आणखी तीन तरण तलावात लुटता येणार पोहण्याचा आनंद; येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये होणार लोकार्पण)
एच पश्चिम विभागातील पाली गाव, नवी कांतवाडी, शेरली राजन, च्युईम गाव, पाली पठार झोपडपट्टी, डॉ. आंबेडकर मार्ग लगतच्या झोपडपट्ट्या, गझधर बंध भाग, दांडपाडा, १६ वा रस्ता व २१ वा रस्ता यांच्यातील खार पश्चिमेचा भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. (Water Cut)
शनिवार, १७ फेब्रुवारी २०२४ नंतर एच पश्चिम प्रभागाचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरु होईल. त्यामुळे पाणी जपून वापरावे व महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. (Water Cut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community