ऑगस्ट महिनासंपत आला तरीही राज्यातील अनेक शहरं मात्र पावसाच्या (Water Shortage) प्रतीक्षेत आहेत. तर, सध्या कोणतीही वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रातील जोरदार पावसासाठी पूरक नाही, त्यामुळे येत्या ७ सप्टेंबरपर्यंत मुंबईसह कोकणात व काहीसा घाटमाथा वगळता उर्वरित राज्यात किरकोळ पावसाव्यतिरिक्त ढगाळ वातावरणाची शक्यता अधिक असणार आहे, असे माजी हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्यात पुण्यासह नाशिक, जळगाव, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बुलढाणा या १० जिल्ह्यांतील सध्या ३५० गावांत आणि १३१९ वाड्यांमध्ये ३६९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा (Water Shortage) करण्यात येत आहे. दरम्यान, “भविष्यातील पावसाची स्थिती लक्षात घेता पाणीपुरवठा विभागाने टंचाईग्रस्त गावे व संभाव्य टंचाई निर्माण होणाऱ्या गावात पाणी वाटपाचे योग्य ते नियोजन करावे, जेणेकरून पुढील टंचाई कालावधीत पाण्याची उपलब्धता होईल. तसेच भविष्यात लागणाऱ्या टॅंकरसाठी पाणी उपलब्ध होईल, असे नियोजन करावे,’ अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
(हेही वाचा – Indian VFX Artist : हॉलीवूडच्या संपामुळे तब्बल १० हजार भारतीय VFX आर्टिस्टच्या डोक्यावर टांगती तलवार)
टंचाई (Water Shortage) कालावधीत करावयाच्या उपाययोजना संदर्भात पाटील यांनी बैठक घेतली. यावेळी पाटील यांनी या सूचना दिल्या. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक अमित सैनी आदींसह दहा जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.पाणीपुरवठ्याच्या (Water Shortage) सर्व योजनांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे अभियानस्तरावर सुरू करावीत, अशा सूचना गुलाबराव पाटील यांनी दिल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community