येत्या बुधवारी व गुरुवारी माहीम खाडी येथील पश्चिम रेल्वे पुलाखालून जाणाऱ्या तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने वांद्रे पश्चिम विभागात येत्या १५ आणि १६ डिसेंबर रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन जलअभियंता विभागाने केले आहे.
तानसा पूर्व मुख्य जलवाहिनीवर कॅपिंगचे काम
मुंबई महापालिकेच्या माहीम खाडी येथील पश्चिम रेल्वे पुलाखालून जाणाऱ्या तानसा पूर्व मुख्य जलवाहिनीवर कॅपिंगचे काम येत्या बुधवारी, १५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता हाती घेण्यात येणार आहे. हे काम गुरुवार, १६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री १० वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या जलवाहिनी दुरुस्तीच्या काळात संपूर्ण वांद्रे (पश्चिम) विभागाला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे आदल्या दिवशीच खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा पुरेसा साठा करावा व काटकसरीने पाणी वापरुन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन जलअभियंता विभागाने केले आहे.
(हेही वाचा काशी दरबारी मोदींकडून शिवपराक्रमाचा उल्लेख, म्हणाले..)
Join Our WhatsApp Community