उत्तर मुंबईतील या भागांमध्ये गुरुवार, शुक्रवारी पाणीकपात

मुंबई महानगरपालिकेच्यावतीने बोरिवली (पश्चिम) परिसरातील ‘आर मध्य’ विभाग परिसरातील ऑरा हॉटेल समोरील लिंक रोडच्या पूर्वेकडील बाजूस १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वळवण्याचे काम गुरुवारी ०५ मे रोजी रात्री ११.५५ वाजता हाती घेण्यात येणार आहे. हे काम ०६ मे २०२२ रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होत आहे. या कालाधीमध्ये बोरीवली व दहिसरमधील काही भागांमध्ये पाणी पुरवठा खंडित होणार असल्याने या विभागातील रहिवाशांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन महापालिकेच्या जलअभियंता विभागाने केले आहे.

( हेही वाचा : पेन्शनधारकांचा चेहराच ठरणार आता हयातीचा दाखला! )

सध्या कडक उन्हाळा सुरु झाल्याने पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे रहिवाशांना अधिक दाबाने पाण्याचा पुरवठज्ञ करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे या भागातील जलवाहिनी वळवण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.

त्यामुळे दहिसर व बोरीवली आदी भागातील नागरिकांनी या कालावधीमध्ये पाणी कपातीपूर्वी आदल्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

या भागांमधील राहणार पाणी पुरवठा बंद

  • ‘आर मध्य’ विभाग (बोरीवली) : चारकोप, गोराई, एक्सर, शिंपोली, वझिरा व संपूर्ण बोरिवली (पश्चिम) विभाग –(सायंकाळी ७.१० ते रात्रौ ९.४० आणि सकाळी ११.५० ते दुपारी १.५० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, दिनांक ०६ मे २०२२ रोजी कामादरम्यान पाणीपुरवठा बंद राहील).
  • ‘आर उत्तर’ विभाग (दहिसर): एलआयसी वसाहत, एक्सर गाव, दहिसर गांव, कांदरपाडा, लिंक रोड व संपूर्ण दहिसर (पश्चिम) विभाग – (रात्री ९.४० ते रात्री ११.५५ ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, दिनांक ०६ मे २०२२ रोजी कामादरम्यान पाणीपुरवठा बंद राहील).

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here