मुंबईत मंगळवार, बुधवारी १५ टक्के पाणीकपात!

आग्रा रोड व्हॉल्व संकुल ते पोगाव दरम्यान येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉइंटच्या दुरुस्तीचे काम येत्या मंगळवारी ५ जानेवारी रोजी हाती घेण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणा-या २४०० मिलीमीटर व्यासाच्या वैतरणा जलवाहिनीवर, आग्रा रोड व्हॉल्व संकुल ते पोगाव दरम्यान येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉइंटच्या दुरुस्तीचे काम येत्या मंगळवारी ५ जानेवारी रोजी हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्ती कामामुळे मुंबईतील बहुतांश भागातील पाणीपुरवठ्यामध्ये मंगळवारी ५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते बुधवार ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपर्यंत २४ तासांच्या कालावधीत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

नवीन वर्षातील पहिली कपात 

नवीन वर्षातील ही पहिली पाणीकपात असून, याचा परिणाम मुलुंड वगळता संपूर्ण मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर होणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या संध्येलाच पाणीकपात होणार असून, भविष्यात मंबईकरांना पाण्याच्या वापराच्यादृष्टीने अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. ही पाणीकपात दुरुस्तीच्या कामामुळे करावी लागत असून, कपातीच्या काळात मुंबईकरांनी पाण्याचा साठा करून ठेवावा. तसेच पाण्याचा वापर जपून करावा,असे आवाहन जलअभियंता व उपायुक्त अजय राठोड यांनी केले आहे.

(हेही वाचा: बालवा-भोसलेंना ठाकरेंचं न्यू ईयर ‘गिफ्ट’!)

या भागात होणार पाणीकपात

शहर विभाग: कुलाबा ते माहिम,धारावीचा परिसर

पश्चिम उपनगरे: वांद्रे ते दहिसरचा परिसर

पूर्व उपनगरे: कुर्ला ते भांडुप-नाहुरपर्यंतचा परिसर


प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here