विशेष प्रतिनिधी,मुंबई
मिलिंद नगर, पवई – व्हेंचुरी येथील १८०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या जोडणीवरील (Water connection) ३०० मिलीमीटर व्यासाच्या पर्यायी जोडणीवर शुक्रवारी २८ फेब्रुवारी २०२५ रोजी अचानक मोठी गळती आढळून आली आहे. त्यामुळे घाटकोपर उच्चस्तरिय जलाशयास होणारा पाणीपुरवठा पूर्णतः बंद (Water supply off) झाला आहे. जलवाहिनी दुरुस्ती (Aqueduct repair) काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून त्यास १५ तासांचा कालावधी अपेक्षित आहे. यामुळे कुर्ला, घाटकोपर, विद्याविहार या महापालिकेच्या एल व एन विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ०५ वाजल्यापासून शनिवारी ०१ मार्च २०२५ रोजी सकाळी ०८ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. (Water Shortage)
त्यामुळे या भागातील परिसरातील नागरिकांनी, पाणी काटकसरीने वापरून बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनास सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
या परिसरात राहणार पाणीपुरवठा बंद
एन विभाग : घाटकोपर, विद्याविहार
प्रभाग क्रमांक १२३, १२४, १२६, १२७, १२८,१३० मधील आनंदगड, शंकर मंदिर, राम नगर, हनुमान मंदिर, राहुल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, वर्षा नगर, जयमल्हार नगर, खंडोबा टेकडी, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकारी वसाहत, वर्षा नगर टाकी (वर्षा नगर येथील शोषण टाकी व उदंचन केंद्रामार्फत वितरण होणारा संपूर्ण परिसर), ‘डी’ आणि ‘सी’ महानगरपालिका वसाहत, रायगड विभाग, गावदेवी पठाण चाळ, अमृतनगर, इंदिरा नगर २, अमीनाबाई चाळ, कातोडी पाडा, भीम नगर, इंदिरा नगर १, अल्ताफ नगर, गेल्डा नगर, जगदुशा नगर, गोळीबार मार्ग, सेवा नगर, ओ. एन. जी. सी. वसाहत, माझगाव बंदर वसाहत, गंगावाडी प्रवेशद्वार क्रमांक २, अंशतः विक्रोळी पार्क साईट परिसर (आनंदगड शोषण टाकी व उदंचन केंद्राद्वारे वितरण परिसर), सिद्धार्थ नगर, साईनाथ नगर आणि पाटीदारवाडी, भटवाडी, बर्वे नगर, काजूटेकडी, न्यू दयासागर व रामजी नगर इत्यादी.
(हेही वाचा – भारतातील पहिले ट्रान्सजेंडर क्लिनिक बंद; भारतीय निवडणूक प्रभावित करण्याचा आरोप झालेली संस्था USAID च पुरवायची क्लिनिकला निधी)
एल विभाग : कुर्ला, टिळकनगर
प्रभाग क्रमांक १५६, १५८, १५९, १६०, १६१, १६४ मधील संघर्ष नगर, खैराणी मार्ग, यादव नगर, जे. एम. एम. मार्ग, लक्ष्मीनारायण मंदिर मार्ग, कुलकर्णीवाडी, सरदारवाडी, डिसुझा कंपाऊंड, अय्यप्पा मंदिर मार्ग, मोहिली जलवाहिनी, लोयलका कुंपण, परेरावाडी, इंद्र मार्केट, भानुशाली वाडी, असल्फा गाव, एन. एस. एस. मार्ग, नारायण नगर, साने गुरुजी पंपिंग, हिल क्रमांक ३, भीम नगर, आंबेडकर नगर, अशोक नगर, हिमालय सोसायटी, वाल्मिकी मार्ग, नुराणी मशीद, मुकुंद कंपाऊंड, संजय नगर, समता नगर, गैबण शाह बाबा दर्गा मार्ग, इत्यादी.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community