पूर्व उपनगरातील ‘या’ वॉर्डात दर शनिवारी राहणार पाणी बंद

237
पूर्व उपनगरातील 'या' वॉर्डात दर शनिवारी राहणार पाणी बंद
पूर्व उपनगरातील 'या' वॉर्डात दर शनिवारी राहणार पाणी बंद

मुंबई महानगरपालिकेतर्फे उप जल अभियंता (परिक्षण) खात्यातील पूर्व उपनगरातील `एल` वॉर्डमधील खैरानी रोडवरील जमिनीखालील १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे (असल्फा आऊटलेट) तुकाराम ब्रिज ते जंगलेश्वर महादेव मंदिर या दरम्यान पुनर्वसन व मजबुतीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी सलग १० दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यापैकी ०७ दिवसांचे काम टप्पेनिहाय पद्धतीने पूर्ण झालेले आहे व उर्वरित कामासाठी सलग ३ दिवसांचा कालावधी लागणार आहे.

परंतु, नागरिकांची गैरसोय लक्षात घेता, हे काम दर शुक्रवारी दुपारी १:०० वाजल्यापासून रविवार पहाटे ०५:०० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.

वास्तव, दर शनिवारी म्हणजेच १३ मे २०२३, २० मे २०२३ व २७ मे २०२३ रोजी `एल` वॉर्ड मधील खाली नमूद केलेल्या विभागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. सर्व संबंधित नागरिकांनी अगोदरच्या दिवसाच खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि पाणी काटकसरीने, उकळून प्यावे असे आवाहन जल अभियंता विभागाने केला आहे.

(हेही वाचा – खडी अभावी रस्त्यांची कामे थांबली नाहीत: प्रशासनाचा दावा)

‘कुर्ला पूर्व’ विभाग

संघर्ष नगर, लॉयलका कंपाउंड, सुभाष नगर, भानुषालीवाडी, यादव नगर, दुर्गामाता मंदीर, कुलकर्णीवाडी, डिसुझा कंपाउंड, लक्ष्मी नारायण रोड, जोश नगर, आझाद मार्केट

(सकाळी ८.०० ते दुपारी १.०० वाजता ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, दर शनिवारी म्हणजेच दिनांक १३ मे २०२३, दिनांक २० मे २०२३ आणि दिनांक २७ मे २०२३ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.