Water Supply : खार पश्चिम भागातील पाणीपुरवठ्यात होणार बदल

362
Water Supply : खार पश्चिम भागातील पाणीपुरवठ्यात होणार बदल
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महानगरपालिकेतर्फे वांद्रे (पश्चिम) येथे पटवर्धन उद्यान, २४ वा रस्ता ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, वांद्रे (पश्चिम) दरम्यान पाली हिल जलाशयासाठी नव्याने अंथरलेल्या ७५० मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्यासंबंधीची कामे गुरुवार, ०३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.०० ते रात्री १२ वाजेपर्यंत (१५ तास) हाती घेण्यात येणार आहेत. (Water Supply)

सदर कारणास्तव ‘एच पश्चिम’ विभागातील खालील नमूद परिसरांमध्ये पाणीपुरवठ्यात उपरोक्त नमूद कालावधीत बदल करण्यात आला आहे. संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणीपुरवठा वेळ बदलाच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापर करावा. तसेच त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी गाळून, उकळून प्यावे. महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. (Water Supply)

(हेही वाचा – IPL 2025 : यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता संघ आपलं घरचं मैदान बदलणार?)

पाणीपुरवठा क्षेत्रात बदल

बाजार परिसर : प्रभावित नाही. पाणीपुरवठा ३० मिनिटे अगोदर सुरु होईल. (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सकाळी ६.०० ते ९.३०) (सुधारित पाणीपुरवठ्याची वेळ – पहाटे ५.३० ते सकाळी ९.००) (Water Supply)

खारदांडा परिसर : खारदांडा कोळीवाडा, दांडपाडा, च्युइम गावठाण, गझदरबंध झोपडपट्टीचा काही भाग, खार पश्चिमेचा काही भाग (पाणीपुरवठा तुलनेने कमी दाबाने) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ५.३० ते रात्री ८.३०) (सुधारित पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ५.३० ते रात्री ८.३०) (Water Supply)

डॉ. आंबेडकर मार्ग परिसर : डॉ. आंबेडकर मार्ग लगतचा परिसर, पाली गावठाण, पाली पठार, वांद्रे पश्चिमेचा व खार पश्चिमेचा काही भाग (पाणीपुरवठा २ तास पुढे ढकलण्यात येणार आहे.) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – रात्री १०.०० ते मध्यरात्रीनंतर ०१.००) (सुधारित पाणीपुरवठ्याची वेळ – रात्री १२.०० ते मध्यरात्रीनंतर ३.००). (Water Supply)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.