अलर्ट…मुंबईच्या ‘या’ भागात आज पाणी कपात!

३ ऑगस्ट रोजी जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे, त्यामुळे या दिवशी पाणी कपात होणार आहे.

महापालिकेच्या पवई वेरावली जलबोगदा व वेरावली जलाशय क्रमांक १ व २ यांच्यामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या इनलेट जोडणीचे काम १२०० मिली व्यासाच्या जोडणीवर झडप बसवणे आणि त्यावर फ्लो मीटर बसवण्याचे काम येत्या ३ ऑगस्ट २०२१ रोजी हाती घेण्यात येणार आहे. तसेच भांडुप संकुलातील झडपा बदलण्याचेही काम त्याच दिवशी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत सकाळी साडेआठ वाजल्यापासून ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत विलेपार्ले ते गोरेगाव आणि कुर्ला, घाटकोपर या भागातील पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तर यातील विलेपार्ले त जोगेश्वरी पूर्व व गोरेगाव आदी भागांमध्ये कमी दाबाने, तर शहरातील परेल ते शीव आदी भागांमध्ये १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.

मंगळवारी, ३ ऑगस्टपासून दुरुस्तीची कामे 

महापालिकेच्या के-पूर्व विभागातील वेरावली परिसरात महापालिकेचे तीन जलाशय असून या जलाशयांमधून संबंधित परिसरातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या जलाशयांमधून पाणीपुरवठा करताना येणाऱ्या तांत्रिक उपाययोजना व सुधारणा आता अंतिम टप्प्यात असून त्यानुसार भूमिगत जलवाहिन्यांची जोडणी करणे, जलवाहिन्यांवर झडप बसवणे, मुख्य जलवाहिनीवर फ्लो मीटर बसवणे आदी कामे मंगळवारी, ३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजल्यापासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातील काही भागांमधील पाणी पुरवठा १०० टक्के कपात, तर काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे. शहर भागातील एफ उत्तर व एफ दक्षिण हे २ विभाग वगळता व पश्चिम उपनगरांमधील सर्व विभागांमध्ये १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा साठा एक दिवस आधी करून ठेवावा आणि पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन जलअभियंता यांनी केले आहे.

(हेही वाचा : अनिल देशमुखांच्या वाढल्या अडचणी! अटकेपासून संरक्षण देण्यास न्यायालयाचा नकार)

या भागात पूर्णपणे पाणीकपात

कुर्ला एल विभाग : प्रभाग क्रमांक १५७ संघर्ष नगर, खैरानी मार्ग आणि परिसर, प्रभाग क्रमांक १५७ यादव नगर, वृंदावन वसाहत, अंजली मेडिकल परिसर, प्रभाग क्रमांक १५९, दुर्गामाता मंदिर रोड, लोयलका कंपाऊंड, भानुशाली वाडी, चर्च गल्ली व परिसर.

घाटकोपर एन विभाग : आनंद नगर पंपिंग स्टेशन व वर्षानगर पंपिंग स्टेशन परिसर, भटवाडी, बर्वे नगर, भीम नगर, गोळीबार मार्ग, जगदुषा नगर, रामजीव नगर, सिध्दार्थ नगर, गावदेवी, अमृत नगर, आझाद नगर, पारशीवाडी, काजू टेकडी, गंगावाडी इत्यादी घाटकोपर पश्चिम.

विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम : गिल्बर्ट टेकडी, जुहू कोळीवाडा, क्रांती नगर, विलासनगर, शक्तीनगर, कदमनगर, आनंदनगर, पाटलीपुत्र, चार बंगला, विरा देसाई मार्ग, प्रथमेश संकुल, मोरागाव, यादव नगर, कॅप्टन सावंत मार्ग, जोगेश्वरी स्टेशन मार्ग, सहकार मार्ग, बांदिवली टेकडी.

विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व : बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानीपाडा, सुभाष मार्ग, चाचा नगर, वांद्रे प्लॉट, हरि नगर, शिवाजी नगर, पास्कल वसाहत, विजय राऊत मार्ग, पाटील वाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली टेकडी, आशिर्वाद चाळ, जुना नागरदास मार्ग, मोगरापाडा, न्यू नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर.के. सिंग मार्ग, निकोलसवाडी परिसर.

गोरेगाव : राम मंदिर, गोरेगाव पश्चिम.

या भागात होणारा कमी दाबाने पाणी पुरवठा

विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व : विशाल सभागृह, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकरवाडी, विमा नगर, पंथकी बाग, तेली गल्ली, हाजी जुमान चाळ, कोलडोंगरी, जीवा महाले मार्ग, सईवाडी, जीवन विकास केंद्र, शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान नगर, श्रध्दानंद मार्ग, नेहरु मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्री नगर, आंबेडकर नगर, काजुवाडी, विलेपार्लेचा बहुतांश भाग

गोरेगाव : बिंबीसार नगर

१५ टक्के पाणी पुरवठा होणारे परिसर

विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व : काही भाग

विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम : काही भाग

गोरेगाव : काही भाग

वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व, कांदिवली, बोरीवली, दहिसर, मालाड, कुलाबा ते लालबाग आणि प्रभादेवी ते माहिम, धारावी.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here