२४ नोव्हेंबरला ‘या’ भागात येणार नाही पाणी!

पुणे महापालिकेकडून येत्या गुरूवारी म्हणजेच २४ नोव्हेंबरला पर्वती जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्रासह, एसएनडीटी पंपिंग स्टेशन येथे तातडीची देखभाल दुरूस्ती कामे हाती घेण्यात येणार असल्याने गुरूवारी पाणी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे, शहरातील सर्व मध्यवर्ती भागातील पेठा, सिंहगड रस्ता, कात्रज परिसर, नगररस्ता, हडपसरचा काही भाग, तसेच औंधभागासह कोथरूड परिसरातील काही भागात पाणी येणार नाही. दुसऱ्या दिवशी शुक्रवार २५ नोव्हेंबरला सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

( हेही वाचा : रेल्वेने घेतला मोठा निर्णय! थर्ड एसी इकोनॉमी कोच बंद होणार; जाणून घ्या तिकीट दरांचे संपूर्ण गणित…)

या भागात पाणी येणार नाही

  • पर्वती एमएलआर टाकी – गुरूवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ
  • पर्वती एचएलआर टाकी परिसर
  • एस.एन.डी.टी. एम.एल. आर. टाकी परिसर
  • पर्वती एलएलआर परिसर – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here