पुणे महापालिकेच्या चतुश्रुंगी पाणीपुरवठा विभागाअंतर्गत सिंध सोसायटी समोरील मेट्रो मार्गात अडथळा ठरणारी पाण्याची लाईन बदलण्याचे काम सुरू आहे. यामुळेच गुरुवार २१ एप्रिल २०२२ रोजी पुणे शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
नागरिकांना सहकार्य करण्याचे पालिकेचे आवाहन
पुण्यातील औंध रस्ता, बोपोडी तसेच बाणेर परिसरात गुरुवार २१ एप्रिल २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारी २२ एप्रिलला सकाळी उशिरा कमी दाबाने पाणी सोडण्यात येणार असून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
या भागात पाणीपुरवठा बंद
औंध गावठाण परिसर, आय.टी.आय. रोड परिसर, स्पायसर कॉलेज परिसर औंध रोड, बोपोडी गावठाण, मुंबई – पुणे रोड, भोईटे वस्ती, सानेवाडी, आनंद पार्क, दर्शन पार्क परिसर, डी-मार्ट परिसर बाणेर फाटा ते महाबळेश्वर हॉटेल दोन्ही बाजूचा परिसर, वर्षा पार्क, माउली मंगल कार्यालय परिसर.
राज्यात मागील वर्षात पडलेला पाऊस तसेच भुजल पातळीचा अभ्यास केला असता राज्यातील सहा जिल्ह्यांतील 15 तालुक्यांमधील 269 गावांमध्ये एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाई जाणवू शकते, अशी शक्यता भूजल सर्वेक्षण विभागाने वर्तविली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 6 तालुक्यांमधील 58 गावांचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community