अलर्ट! पाणी जपून वापरा! ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद!

143

मुंबई महानगरपालिकेच्यावतीने लोअर परळ येथे सेनापती बापट मार्गावरील गावडे चौकात १४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम सोमवारी १४ मार्च २०२२ रोजी सकाळी ८.०० वाजता सुरु होईल आणि मंगळवारी १५ मार्च २०२२ रोजी दुपारी २.०० वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या कालावधीत महानगरपालिकेच्या वरळी, प्रभादेवी, दादर, माहिम आणि धारावी या जी/दक्षिण आणि जी/उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तर वरळीतील काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

या संबंधीत परिसरातील नागरिकांनी या कालावधीत पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती व आवाहन मुंबई महानगरपालिका जल अभियंता विभागाने केले आहे.

( हेही वाचा : मुंबईकरांना उन्हाचे चटके तर, राज्यात ‘या’ भागात पडणार पाऊस )

वरळीतील या पट्ट्यात येणार नाही पाणी

जी/दक्षिण विभागः डिलाई रोड बी. डी. डी चाळ, संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार मार्ग – (सोमवार, १४ मार्च २०२२ रोजी दुपारी २.३० ते दुपारी ३.३० वाजता डिलाई रोड पाणीपुरवठा आणि दुपारी ३.३० ते सायंकाळी ७.०० वाजता शहर पाणीपुरवठा – (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – पाणीपुरवठा होणार नाही)

माहीम, दादर, माटुंगा या भागात नसेल पाणी

जी/उत्तर विभागः संपूर्ण प्रभादेवी परिसर, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेनाभवन परिसर, मोरी मार्ग, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार, पूर्ण माहीम (पश्चिम) विभाग, माटुंगा (पश्चिम) विभाग, दादर (पश्चिम) विभाग – (सोमवार, १४ मार्च २०२२ रोजी दुपारी ४.०० ते सायंकाळी ७.०० वाजता तसेच सायंकाळी ७.०० ते रात्री १०.०० वाजता – (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – पाणीपुरवठा होणार नाही).

मंगळवारी ‘या’ भागात येणार नाही पाणी

वरळी- लोअर परेल,जी/दक्षिण विभागः

ना. म. जोशी मार्ग, डिलाई रोड बी.डी.डी., सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग – (मंगळवार दिनांक १५ मार्च २०२२ रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ७.४५ वाजता डिलाई रोड पाणीपुरवठा – (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – पाणीपुरवठा होणार नाही)

जी/दक्षिण विभागः

धोबीघाट, सातरस्ता – (मंगळवार, १५ मार्च २०२२ रोजी पहाटे ४.०० ते सकाळी ७.०० वाजता डिलाई रोड पुरवठा – (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – पाणीपुरवठा कमी दाबाने होईल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.