मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद!

173

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे ई विभागातील पाणी पुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै जंक्शन म्हातारपाखाडी तसेच डॉकयार्ड मार्गालगत असलेली १,४५० मिलीमीटर व्यासाची जुनी जलवाहिनी निष्कासित करण्याचे काम शुक्रवार, २१ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजेपासून शनिवार, २२ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत ए, बी, ई, एफ/दक्षिण व एफ/उत्तर या विभागांमधील खालील नमूद परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्याचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे.

( हेही वाचा : राणीबागेत जन्मली मुंबईकर वाघीण! ‘वीरा’ तिचे नाव… )

१) ए विभाग – नेव्हल डॉकयार्ड सप्लाय – (दुपारी १.४० ते ४ वाजता) आणि (रात्री ९.४० ते मध्यरात्री २.४५ वाजता) – सेंट जॉर्ज हॉस्पिटल, पी. डिमेलो मार्ग, रामगड झोपडपट्टी, आर. बी. आय., नेव्हल डॉकयार्ड, शहीद भगतसिंग मार्ग, जी. पी. ओ. जंक्शन पासून रिगल सिनेमापर्यंत – २१ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.

२) बी विभाग – बाबुला टँक झोन – (पहाटे ४ ते सकाळी ६.२५ वाजता) – मोहम्मद अली मार्ग, इब्राहिम रहिमत्तुला मार्ग, इमामवाडा मार्ग, इब्राहिम मर्चंट मार्ग, युसूफ मेहेर अली मार्ग –  २२ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद

  • डोंगरी B झोन – (पहाटे ४.३० ते सकाळी ६.१५ वाजता) – नूरबाग, रामचंद्र भट मार्ग, सॅम्युअल स्ट्रिट, केशवजी नाईक मार्ग, नरसी नाथा रस्ता – २२ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद
  • डोंगरी A झोन – (सकाळी ८.२५ ते सकाळी १०.०५ वाजता) – उमरखाडी , शायदा मार्ग आणि नूरबाग, डॉ . महेश्वरी मार्ग – २१ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद
  • बी. पी. टी. झोन – (पहाटे ४.२० ते सकाळी ६.२० वाजता) आणि (रात्री ११.३० ते मध्यरात्री १ वाजता) – संपूर्ण बी. पी. टी. झोन, पी. डिमेलो मार्ग – २१ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद
  • मध्य रेल्वे – (सायंकाळी ७ ते रात्री ८ वाजता) – रेल्वे यार्ड – २१ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद
  • वाडी बंदर – (सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ५.३० वाजता) – पी. डिमेलो मार्ग – २२ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद
  • वाडी बंदर – (सायंकाळी ७.१५ ते रात्री ८.०० वाजता) – पी. डिमेलो मार्ग – २१ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद

३) ई विभाग – नेसबीट झोन (१४५० मिलीमीटर आणि ८०० मिलीमीटर) – (पहाटे ४ ते सकाळी ६.३० वाजता) – ना. म. जोशी मार्ग, मदनपुरा, कामाठीपुरा, एम. एस. अली मार्ग, एम. ए. मार्ग, आग्रीपाडा, टँक पाखाडी मार्ग, क्लेअर रोड, भायखळा (पश्चिम) – २२ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद

  • म्हातारपाखाडी रोड झोन – (सकाळी ६.३५ ते सकाळी ८.१५ वाजता) – म्हातारपाखाडी मार्ग, सेंट मेरी मार्ग, नेसबीट मार्ग, ताडवाडी रेल्वे कम्पाऊंड – २२ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.
  • डॉकयार्ड रोड झोन – (दुपारी १२.२० ते दुपारी २.५० वाजता) – बॅरिस्टर नाथ पै मार्ग, डिलिमा रस्ता, गणपावडर मार्ग, कासार गल्ली, लोहारखाता, कोपरस्मिथ मार्ग – २२ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.
    हातीबाग मार्ग – (दुपारी ३.२० ते सायंकाळी ५ वाजता) – हातीबाग, शेठ मोतिशहा गल्ली, डि. एन. सिंग मार्ग – २१ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.
  • जे. जे. रुग्णालय – (२४ तास पाणीपुरवठा) – जे. जे. रुग्णालय – कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
  • बी. पी. टी. झोन – (पहाटे ४.४५ ते पहाटे ५.५५ वाजता) – बी. पी. टी ., दारुखाना लडाख नगर – २१ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.
  • रे रोड झोन – (सायंकाळी ७ ते रात्री ८.३० वाजता) – बॅरिस्टर नाथ पै मार्ग, मोदी कंम्पाऊंड , ऍटलास मील कम्पाऊंड , घोडपदेव छेद गल्ली १-३ – २१ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.
  • माऊंट रोड – (सायंकाळी ७.१५ ते रात्री ९ वाजता) – रामभाऊ भोगले मार्ग, फेरबंदर नाका, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, घोडपदेव नाका, म्हाडा संकुल, भायखळा (पूर्व), शेठ मोतिशहा गल्ली, टी . बी. कदम मार्ग, सावता मार्ग – २१ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद

(हेही वाचा गड-किल्ल्यांच्या इस्लामीकरणाविरुद्ध भाजपने थोपटले दंड)

४) एफ/दक्षिण विभाग

  • रुग्णालय प्रभाग – (२४ तास पाणीपुरवठा) – के. ई. एम. रुग्णालय, टाटा रुग्णालय, बाई जेरबाई वाडिया रुग्णालय आणि एम. जी. एम. रुग्णालय – २१ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.
  • अभ्युदय नगर – (मध्यरात्री २.१५ ते सकाळी ६ वाजता) – अभ्युदय नगर, ठोकरसी जीवराज मार्ग – २२ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.
  • शहर दक्षिण पाणीपुरवठा – (पहाटे ४ ते सकाळी ७ वाजता) – लालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जगन्नाथ भातणकर मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, गोविंदजी केरी मार्ग, हिंदमाता – २२ जानेवारी २०२२ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा.
  • शहर उत्तर पाणीपुरवठा – (सकाळी ७ ते सकाळी १० वाजता) – दादर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जगन्नाथ भातणकर मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, हिंदमाता – २२ जानेवारी २०२२ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा.

गोलंजी हिल पाणीपुरवठाः

अ) नायगांव – (सकाळी ७ ते सकाळी १० वाजता) – जेरबाई वाडिया मार्ग, स्प्रिन्ग मिल चाळ, गं. द. आंबेकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, शेटये मार्केट, भोईवाडा गांव, हाफकिन – २२ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

ब) परळ गांव – (दुपारी १.४५ ते सायंकाळी ४.४५ वाजता) – गं. द. आंबेकर मार्ग ५० टेनामेंटपर्यंत, एकनाथ घाडी मार्ग, परळ गांव मार्ग, नानाभाई परळकर मार्ग, भगवंतराव परळकर मार्ग, विजयकुमार वाळिंभे मार्ग, एस. पी. कंपाऊंड – २१ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

क) काळेवाडी – (रात्री ८.३० ते रात्री ११.३० वाजता) – परशुराम नगर, जिजामाता नगर, आंबेवाडी (भाग), साईबाबा मार्ग, मिंट वसाहत, राम टेकडी – २१ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

शिवडी (पूर्व) – (सायंकाळी ७ ते रात्री ९.३० वाजता) – शिवडी किल्ला मार्ग, गाडी अड्डा, शिवडी कोळीवाडा – २१ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

शिवडी (पश्चिम) – (सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ७ वाजता) – आचार्य दोंदे मार्ग, टि. जे. मार्ग, झकेरिया बंदर मार्ग, शिवडी छेद मार्ग – २१ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

५) एफ/उत्तर विभाग –

  • रावळी जलाशय पुरवठा – (पहाटे ४.१० ते सकाळी ९.१० वाजता) – ट्रान्झिट कॅम्प कोकरी आगार, आंबेडकर नगर, विजय नगर, जय महाराष्ट्र नगर, संगम नगर, शांती नगर, दीनबंधू नगर, वडाळा अग्निशमन स्थानक, विद्यालंकार महाविद्यालय, शिवशंकर नगर, सी. जी. सी. सेक्टर १ ते ७, मुकुंदराव आंबेडकर मार्ग, मोतिलाल नेहरु नगर, जे. के. बसीन मार्ग, जयशंकर याज्ञिक मार्ग, सरदार नगर १ ते ४, नेहरु नगर, इंदिरा नगर, अल्मेडा कम्पाऊंड, के. डी. गायकवाड नगर, पंजाबी वसाहत, महात्मा गांधी नगर, आचार्य अत्रे नगर, आदिनाथ सोसायटी आणि एस. एम. मार्ग, बंगालीपुरा, जायकरवाडी, भीमवाडी परिसर – २२ जानेवारी २०२२ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा.
  • शहर पाणीपुरवठा – (सकाळी ७ ते १० वाजता) – शीव (पश्चिम), शीव (पूर्व), माटुंगा (पूर्व), दादर (पूर्व), वडाळा (पूर्व), वडाळा (पश्चिम), कोरबा मिठागर, आनंदवाडी, आझाद मोहल्ला नगर – २२ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.
  • गेट क्रमांक ४ – (पहाटे ४.१० ते सकाळी १० वाजता) – भीमवाडी, कोरबा मिठागर – २२ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.
  • गेट क्रमांक ४ – (सायंकाळी ५ ते ७ वाजता) – कोरबा मिठागर –  २१ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

पाणी जपून वापरा

सर्व संबंधीत विभागातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, उपरोक्त नमूद कालावधीतील पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक तितका साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यासाठी देखील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.