पाणी जपून वापरा! ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद

135

पर्वती जलकेंद्र पंपिंग, एस.एन.डी.टी, वारजे जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र येथील पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे गुरूवार, 24 मार्चला पुणे शहराच्या निम्म्या भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवार, २५ मार्चला सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल असे पाणी पुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

( हेही वाचा : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, ‘या’ जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत होणार वाढ! )

या भागात येणार नाही पाणी

पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपिंग)- सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रोड परीसर, पद्मावती, बिबवेवाडी, इंदिरानगर परीसर, कर्वे रोड ते एस. एन. डी. टी. परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेजरोड, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर,सर्व्हे क्रमांक४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर,पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र.

चतु:श्रृंगी-एस.एन.डी.टी-वारजे जलकेंद्र परीसर :- पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रृंगी परिसर, गोखले नगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधान, बाणेर, चांदणी चौक इ. परिसर किष्किंदा नगर,रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परीसर, महात्मासोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे युनिर्व्हसिटी परीसर, वारजे हायवे परीसर, वारजे माळवाडी, रामनगर,अहिरेगाव, पॉप्लयुलर नगर, अतुल नगर, शाहु कॉलनी, वारजे जलशुध्दीकरणाचा परीसर, औंध बावधन, सुस, सुतारवाडी, भुगाव रस्ता परीसर

नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपिंग भाग :- विद्यानगर, टिंगरे नगर, कळस, धानोरी, लोहगाव, मुळा रोड, खडकी, हरीगंगा सोसायटी इत्यादी.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.