शनिवार आणि रविवारी लोअर परेल, वरळी ते माहिम, धारावीपर्यंतच्या भागातील पाणीपुरवठा बंद

जलवाहिनी दुरूस्ती कारणाने जी दक्षिण व जी उत्तर विभागातील काही परिसरात शनिवार दिनांक २७ मे २०२३ रोजी सकाळी ८ ते दिनांक २८ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजेदरम्यान पाणीपुरवठा बंद

632
शनिवार आणि रविवारी लोअर परेल, वरळी ते माहिम, धारावीपर्यंतच्या भागातील पाणीपुरवठा बंद
शनिवार आणि रविवारी लोअर परेल, वरळी ते माहिम, धारावीपर्यंतच्या भागातील पाणीपुरवठा बंद

दादर पश्चिम परिसरात १४५० मिमी व्यासाच्या तानसा जलवाहिनीला लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी शनिवार २७ मे २०२३ रोजी सकाळी ८ ते रविवार २८ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजेदरम्यान कामे हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या २६ तासांच्या कालावधीत लोअर परेल, वरळी ते माहिम धारावीपर्यंतच्या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीमध्ये पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन महापालिका जलअभियंता विभागाने केला आहे.

दादर (पश्चिम) मधील सेनापती बापट मार्ग व काकासाहेब गाडगीळ मार्ग यांच्या जंक्शनवर अस्तित्वात असलेल्या १,४५० मिमी व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम जलअभियंता विभागाकडून हाती घेण्यात येणार आहे. शनिवारी २७ मे २०२३ रोजी सकाळी ८ वाजता हे काम सुरू होईल आणि रविवारी २८ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजता ते पूर्ण होईल. या अंतर्गत गळती शोधण्यासाठी संपूर्ण जलवाहिनीचा पुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यामुळे याठिकाणी पाणी कपात घेऊन त्यानंतर नेमकी गळती शोधून पॅच वर्क किंवा रिबेट बदलून दुरुस्ती पूर्ण करण्यात येईल. सध्या गळती शोधण्यासाठीचे प्राथमिक काम सुरू करण्यात आल्याची माहिती जलअभियंता विभागाने दिली आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या प्रत्यक्ष या कालावधीत लोअर परेल ते प्रभादेवी या जी-दक्षिण विभागात आणि दादर, माहिम आणि धारावी या जी-उत्तर विभागात पाणी पुरवठा खंडित राहणार आहे.

त्यामुळे जलवाहिनी दुरुस्ती कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

‘या’ विभागात राहणार पाणीपुरवठा बंद

जी उत्तर विभाग 

संपूर्ण माहीम पश्चिम, माटुंगा पश्चिम, दादर पश्चिम विभाग, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, मोरी मार्ग, सेनाभवन परिसर, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार या परिसरात शनिवारी २७ मे रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० या कालावधीत पाणीपुरवठा होणार नाही.

जी दक्षिण विभाग 

डिलाईरोड बीडीडी, संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परेल विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस.एस. अमृतवार या परिसरात शनिवारी २७ मे रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ७ या कालावधीत पाणीपुरवठा होणार नाही.

जी दक्षिण विभाग 

ना. म. जोशी मार्ग, डिलाईरोड बीडीडी, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, धोबीघाट, सातरस्ता या परिसरात रविवार २८ मे रोजी पहाटे ४ ते सकाळी ८ या कालावधीत पाणीपुरवठा होणार नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.