MHADA : विरार-बोळींज म्हाडा प्रकल्पाला सूर्या प्रकल्पातून पाणीपुरवठा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीएने) सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पातून वसई-विरार महानगर पालिकेला पाणी पुरवठा सुरू केला असल्याने म्हाडाच्या कोंकण मंडळाच्या अखत्यारीतील विरार-बोळींज येथील गृहनिर्माण प्रकल्पाला नियमित पाणी पुरवठा सुरू होण्यास सुरुवात झाली आहे.

279
Mhada old buildings : म्हाडातर्फे मास्टर लिस्टवरील पात्र अर्जदारांची २८ डिसेंबरला संगणकीय सोडत
Mhada old buildings : म्हाडातर्फे मास्टर लिस्टवरील पात्र अर्जदारांची २८ डिसेंबरला संगणकीय सोडत

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पातून वसई-विरार महानगर पालिकेला पाणी पुरवठा सुरू केला असल्याने म्हाडाच्या कोंकण मंडळाच्या अखत्यारीतील विरार-बोळींज येथील गृहनिर्माण प्रकल्पाला नियमित पाणी पुरवठा सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे विरार-बोळींज येथील २२७७ सदनिकांच्या विक्रीसाठी जाहीर संगणकीय सोडतीसाठी अर्ज करण्याकरिता अर्जदारांना प्रोत्साहन मिळणार असून यापूर्वीच्या सोडतीत सदनिकांचा ताबा घेतलेल्या २३८४ सदनिका धारकांना दिलासा मिळाला आहे. (MHADA)

कोंकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या सोडतीत विरार-बोळींज येथील प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २२७७ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील विरार-बोळींज प्रकल्पातील सदनिका घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांकरिता मंडळातर्फे उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आली असून अर्जदाराने उत्पन्नाचा कुठलाही पुरावा सादर करणे गरजेचे नाही. अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे आधारकार्ड व पॅन कार्ड आवश्यक असून अर्जदार विवाहित असल्यास पती व पत्नी दोघांचे आधारकार्ड, पॅन कार्ड लागणार आहे. एक अर्जदार या प्रकल्पात एकापेक्षा अधिक सदनिकांकरीता अर्ज करू शकतात. या सर्व इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त (OC received) असून रेडी टू मुव्ह स्वरुपातील मालमत्ता आहे. अर्जदारांनी विक्री किंमत भरल्यावर दोन आठवड्यात ताबा दिला जाणार आहे. (MHADA)

(हेही वाचा – Marathi Signboards : येत्या मंगळवारपासून मुंबईतील सुमारे पाच हजार दुकानांवर कारवाई)

विस्तृत ४१ एकरवरील या प्रकल्पाबाबत अधिक माहितीसाठी म्हाडाच्या ०२२ ६९४६८१०० या २४ तास कार्यरत हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. या योजनेतील शेवटची सदनिका विकली जाईपर्यंत नोंदणीकरण आणि अर्ज भरणा प्रक्रिया सुरू राहील. तसेच प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या योजनेत सहभाग घेण्याकरिता https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी व अर्ज भरण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. अनामत रक्कम भरणा व परतावा संबंधित सुविधेकरिता इंडियन बँकेच्या ७०६६०४७२१४ व ९५२९४८५७८० या कॉल सेंटर हेल्पलाइन वर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. (MHADA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.