ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे बंधारा येथील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे शहराकडे येणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे . या कारणांमुळे शहरामध्ये पुढील चार दिवस कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे. पाणी कपात झाल्याने ठाणेकरांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेने केले ठाणेकरांना आवाहन
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.
(हेही वाचा – ‘सिल्वर ओक’ वरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची पोलिसांना होती पूर्वकल्पना!)
पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पालिकेचा निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्रोतांमार्फत दररोज ४८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या योजनेतून २१० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. या योजनेसाठी भातसा धरणाच्या पिसे बंधारा येथून पाणी उचलण्यात येते. या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी अचानकपणे कमी झाल्यामुळे महापालिकेला पुरेसे पाणी उचलणे शक्य होत नाही. या कारणांमुळे शहरामध्ये पुढील चार दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
Join Our WhatsApp Community