मालाड (पूर्व) येथील मालाड टेकडी जलाशयावरील ईनलेट व आऊटलेटवरील असणार्या झडपा बदलण्याचे काम सोमवार ९ ऑक्टोबर २०२३ रोजी आणि शुक्रवारी १३ ऑक्टोबर २०२३ रोजी हाती घेण्यात येणार आहे या कालावधीत ‘पी दक्षिण’ (गोरेगाव ), ‘पी उत्तर’ (मालाड) आणि आर दक्षिण’( कांदिवली) या भागात काही परिसरात पाणीपुरवठा या दोन्ही दिवशी बंद राहणार आहे.
मुंबई महानगरपालिकेद्वारे (BMC) मालाड (पूर्व) येथील मालाड टेकडी जलाशयावरील ईनलेट व आऊटलेटवरील असणार्या झडपा, जुन्या व खराब झाल्यामुळे एकूण १० जलद्वार बदलण्याचे काम केले जाणार असून संपूर्ण काम दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ९०० मिली मीटर व्यासाचे तीन व ७५० मिली मीटर व्यासाचा ०१ असे एकूण ०४ जलद्वारे अर्थात वॉल्व हे सोमवारी ०९ ऑक्टोबर २०२३ रोजी बदलण्यात येणार आहेत.
(हेही वाचा Goregaon Fire : एसआरएच्या इमारतींचे ऑडिट होणार’, गोरेगावातील आगीमधील जखमींची मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली भेट)
तर दुस-या टप्प्यात ९०० मिली मीटर व्यासाचे ०२ व ७५० मिली मीटर व्यासाचा ०१ असे एकूण ०३ जलद्वार शुक्रवारी १३ ऑक्टोबर २०२३ रोजी बदलण्यात येणार आहेत. या कालावधीत सोमवारी ०९ ऑक्टोबर २०२३ रोजी व शुक्रवारी १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत (१६ तास) ‘पी उत्तर’ विभागातील मालाड (पूर्व), ‘पी दक्षिण’ विभागातील गोरेगाव (पूर्व) आणि ‘आर दक्षिण’ विभागातील काही परिसरांमध्ये संपूर्ण पाणीपुरवठा बंद राहील,असे जल अभियंता विभागाने स्पष्ट केले आहे. या कालावधीत पाणी कपातीपूर्वी आदल्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती महानगरपालिका (BMC) प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
‘पी उत्तर’, ‘पी दक्षिण’ आणि ‘आर दक्षिण’ विभागातील पाणीपुरवठा खंडित होणा-या परिसरांची माहिती
- ‘पी उत्तर’ – मालाड (पूर्व) परिसर – पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.
- ‘पी दक्षिण’ – गोरेगाव (पूर्व) परिसर – पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.
- ‘आर दक्षिण’ – कांदिवली (पूर्व) येथील बाणडोंगरी, झालावाड नगर, अशोकनगर (काही भाग), लोखंडवाला, हनुमान नगर, वडारपाडा – १ व २, नर्सीपाडा परिसर – पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.