Water Supply : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत पाणी किती? किती वाढला साठा… जाणून घ्या!

15020
Water Supply : जुलैच्या सुरुवातीला निम्म्यावर आलेला जलसाठा आता मागील दोन वर्षांच्या तुलनेत सर्वांधिक

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व तलावांच्या साठ्यात आता थेंबे थेंबे तळे साचे या प्रकारे वाढ होत असून ४ जुलै पर्यंत पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व तलाव आणि धरणे यामध्ये एकूण ८.५९ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. मात्र मागील दोन गेल्या वर्षांच्या च्या तुलनेत हा साठा अद्यापही कमी आहेच आहे. (Water Supply)

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, आणि तुळशी या सात तलावांमधून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर्स एवढा पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी यासर्व धरण तथा तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आता हळूहळू वाढ होत असून यासर्व धरणांमध्ये पाण्याच्या साठा मागील चार दिवसांच्या या कालावधीत सुमारे तीन टक्के एवढा पाणी साठा वाढला आहे. ४ जुलै पर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सर्व तलाव आणि धरणामध्ये १ लाख २४ हजार ३४३ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईकरांची वर्ष भराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. त्यातुलनेत आता ८.५९टक्के पाणी साठा जमा झाला आहे. (Water Supply)

(हेही वाचा – सागरी सुरक्षेसाठी पोलिस दलातील पद भरती प्रक्रिया तातडीने करणार; DCM Devendra Fadnavis यांची माहिती)

गेल्या वर्षी आजच्याच दिवशी म्हणजेच ४ जुलै २०२३ रोजी सातही तलावांचा एकूण पाणीसाठा हा २ लाख ५५ हजार ६२२ दशलक्ष लीटर एवढा होता, जो यंदाच्या तुलनेत दुप्पट होता. तर त्याआधीच्या वर्षी म्हणजेच ४ जुलै २०२२ रोजी १ लाख ९३ हजार ३०९ दशलक्ष लीटर एवढा होता, जो यंदाच्या पाणीसाठ्यापेक्षा दुपटीनेही अधिक होता. (Water Supply)

४ जुलै २०२४ : ०१ लाख २४ हजार ३४३ दशलक्ष लिटर (८.५९ टक्के)

३ जुलै २०२४ : १ लाख १९ हजार २३१ दशलक्ष लिटर (८.२४ टक्के)

२ जुलै २०२४ : १ लाख ०३ हजार ५०३ दशलक्ष लिटर (७.१५ टक्के)

१ जुलै २०२४ : ८५ हजार ६०५ दशलक्ष लिटर (५.९१ टक्के)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.