Water supply : गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद

शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

104
Water supply : गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद
Water supply : गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीतर्फे पर्वती उपकेंद्रात तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी, 31 ऑगस्ट रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे तसेच शुक्रवारी, सकाळी 1 सप्टेंबर रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पर्वती एमएलआर, पर्वती एचएलआर, पर्वती एलएलआर टाक्या, लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, नवे आणि जुने होळकर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब टीएसआर टाकी, वारजे जलकेंद्र जीएसआर टाकी, एसएनडीटी एमएलआर आणि एचएलआर परिसर, चतुश्रृंगी टाकी, कोंढवे धावडे जलकेंद्र, भाभा आसखेड जलकेंद्र आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या परिसरातील पाणीपुरवठा बंद असणार आहे.

(हेही वाचा – Bombay High Court : चक्क इमारतीनेच उच्च न्यायालयात दाखल केली याचिका; जाणून घ्या नेमका प्रकार काय?)

पाणीपुरवठा बंद असणारा परिसर…
मध्यवर्ती भाातील सर्व पेठा, क्वार्टरगेट परिसर, गंजपेठ, गुरुवार पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर, स्वारगेट, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर १ आणि २, लेक टाऊन परिसर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी गावठाण, डायस प्लाॅट, ढोले मळा परिसर, सॅलेसबरी पार्क, गिरीधर भवन चौक परिसर, पर्वती गावठाण, मीठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज, धनकवडी परिसर, हडपसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळे पडळ, बीटी कवडे रस्ता, भीमनगर, रामटेकडी, औद्योगिक परिसर, वानवडी, पुणे कॅन्टोन्मेंट परिसर, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरूळी देवाची, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी, खराडी, वडगांवशेरी, ताडीवाला रस्ता, मंगळवार पेठ, मालधक्का, येरवडा, रेसकोर्स, मुळा रस्ता, खडकी, हरीगंगा सोसायटी, लोहगांव, विमाननगर, वडगांवशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, कळस, धानोरी, पाषाण, भूगाव रस्ता, बावधन, उजवी आणि डावी भुसारी काॅलनी, गुरूगणेशनगर, चिंतामणी सोसायटी, पूजा पार्क, सारथी शिल्प सोसायटी, डुक्कर खिंड परिसर, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमंहसनगर, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, सूस रस्ता, रेणूकानगर, पाॅप्युलर नगर, वारजे माळवाडी, गोकुळनगर, अतुलनगर, महात्मा सोसायटी, एकलव्य महाविद्यालय परिसर, धनंजय सोसायटी, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद, लक्ष्मीनगर झोपडपट्टी परिसर, हिंगणे होम काॅलनी, कर्वेनगर, कर्वेनगर गावठाण, तपोधान परिसर, रामनगर, कालवा रस्ता, बाणेर, बालेवाडी, पॅनकार्ड क्लब रस्ता, विजनगर, दत्तनगर, कर्वेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर गल्ली क्रमांक एक ते दहा, गोखलेनगर, औंध, बोपोडी, विद्यापीठ परिसर, विधी महाविद्यालय रस्ता, बीएमसीसी, आयसीएस काॅलनी, भोसलेनगर, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, दशभूजा गणपती परिसर, नळस्टाॅप, वकीलनगर, करिष्मा सोसायटी, शिवाजीनगर, गोखलेनगर, माॅडेल काॅलनी परिसर, रेव्हेन्हू काॅलनी, कोथरूड, वडारवाडी, श्रमिक वसाहत, डहाणूकर काॅलनी, सुतारदरा, किष्किंदानगर, जयभवानीनगर, केळेवाडी, आयडीयल काॅलनी, जनवाडी, वैदूवाडी, संगमवाडी, हिंगणे, आनंदनगर, वडगांव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव, येवलेवाडी या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.