ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! शुक्रवारी काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील उन्नतीकरण आणि मजबुतीकरणची कामे हाती घेतलेली आहेत. यामुळे शुक्रवार, २७ जानेवारी रोजी एम आयडीसीच्या जांभूळ जलशुद्धी केंद्रातून होणारा पाणीपुरवठा गुरुवार रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार रात्री १२ वाजेपर्यंत म्हणजेच २४ तासांकरिता बंद राहील.

यामुळे दिवा, खर्डी, पडले, देसाई, खिडकाळी, डायघर, डावले, भोलेनाथ-सिबलीनगर, कौसा, मुंबा कळवा, गणपतीपाडा विटावा कोलशेत, नेहरूनगर इ. ठिकाणचा पाणी पुरवठा बंद राहील याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नोंद घेवून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

(हेही वाचा – बोरीवली पश्चिम येथील एसव्ही रोडवरील कल्व्हर्ट पूल तोडून बांधणार नव्याने)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here