ठाणेकरांनो, ‘या’ भागात होणार पाणी पुरवठा बंद!

110

ठाणे महानगरपालिकेच्या पिसे उदंचन केंद्रातील जॅकवेलमधील कचरा, गाळ काढण्यासाठी व टेमघर शुध्दीकरण केंद्रामधील तसेच शहरातील विविध ठिकाणी तातडीने देखभाल व दुरुस्तीची कामे करण्याकरीता पाणी पुरवठा शटडाऊन करण्यात येणार आहे. यामुळे पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन ठाणे पालिकेने केले आहे.

या भागात पाणी पुरवठा बंद

या शटडाऊनमुळे बुधवार, 15 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते गुरुवार, 16 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत ठाणे शहरातील इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर, रामनगर, डिफेन्स, किसननगर, घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, समतानगर, आकृती, सिध्देश्वर, जॉन्सन, ईटरनिटी, ब्रम्हांड, विजयनगरी, गायमुख, बाळकुम, कोलशेत, आझादनगर या भागात पाणी पुरवठा बंद राहील. तसेच बुधवार, 15 डिसेंबर रात्री 9 ते गुरुवार, 16 डिसेंबर सकाळी 9 वाजेपर्यंत ऋतु पार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, कळवा व मुंब्रा परिसरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

( हेही वाचा : मेट्रो ३ च्या कारशेड मुद्द्यावरुन रणकंदन, आरेत पुन्हा वृक्षतोड! )

पाणी पुरवठा विभागाचे आवाहन

या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.