मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा… ‘या’ दिवशी पाणी येणार नाही

महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

190

मुंबई महापालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागातील परळ, काळेवाडी, नायगांव इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी काही तांत्रिक कामे हाती घेतली जाणार आहेत. ही कामे योग्यप्रकारे होण्याच्या दृष्टीने मंगळवारी ५ ऑक्टोबर सकाळी १० वाजल्यापासून ते बुधवार ६ ऑक्टोबर सकाळी १० वाजेपर्यंत या परिसरातील पाणीपुरवठा २४ तासांसाठी खंडित करण्यात येणार आहे.

या कालावधीत गोलंजी टेकडी जलाशयाच्या आतील परिसरातील ७५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे व ४५० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी करण्यात येणार असून, ४५० मिलीमीटर व्यासाच्या २ जलवाहिन्या निष्कासित करण्यात येणार आहेत.

(हेही वाचाः यंदा मुंबईकरांची 100 टक्के तहान भागणार)

महापालिकेचे आवाहन

ही बाब लक्षात घेता, पाणीपुरवठा खंडित करण्यात येणा-या परिसरातील रहिवाशांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे, आदल्या दिवशी पुरेसा पाणीसाठा करुन ठेवावा, सदर कामाच्या कालावधीमध्ये महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

कोणत्या भागात कोणत्या वेळेत पाणीपुरवठा नाही

परळ गांव येथील

  •  गं. द. आंबेकर मार्ग ५० टेनामेंटपर्यंत
  • एकनाथ घाडी मार्ग
  • परळ गांव मार्ग
  • नानाभाई परळकर मार्ग
  • भगवंतराव परळकर मार्ग
  • विजयकुमार वाळिंभे मार्ग
  • एस. पी. कंपाऊंड

या परिसरांना दररोज दुपारी १.४५ ते सायंकाळी ४.४५ या कालावधी दरम्यान पाणीपुरवठा करण्यात येतो. तथापि, दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी हा पाणीपुरवठा करण्यात येणार नाही.

(हेही वाचाः मुंबईतील दूषित पाण्याचा टक्का वाढला, पण हे विभाग झाले दूषित पाणीमुक्त)

काळेवाडी येथील

  • परशुराम नगर
  • जिजामाता नगर
  • आंबेवाडी (भाग) साईबाबा मार्ग
  • मिंट वसाहत
  • राम टेकडी

या परिसरांना दररोज रात्री ८.३० ते ११.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येतो. पण ५ ऑक्टोबर २०२१ रोजी हा पाणीपुरवठा करण्यात येणार नाही.

नायगांव येथील

  • जेरबाई वाडिया मार्ग
  • स्प्रींग मिल चाळ
  • गं. द. आंबेकर मार्ग
  • गोविंदजी केणी मार्ग
  • शेट्ये बाजार
  • भोईवाडा गांव आणि हाफकिन

या परिसरांना दररोज सकाळी ७.०० ते १०.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येतो. पण ६ ऑक्टोबर २०२१ रोजी हा पाणीपुरवठा करण्यात येणार नाही.

(हेही वाचाः उद्यान, मैदान देखभालीचे कंत्राट: कंत्राटदारांचा ‘टक्का’ पुन्हा घसरला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.