BMC : महापालिका मुख्यालयाला टँकरद्वारे पाणी पुरवठा; पिण्याच्या पाण्याचा वापर फ्लशिंगकरता

मुख्यालय इमारतीला कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने याठिकाणी असलेल्या टाक्या पूर्णक्षमतेने भरल्या जात नाही. त्यामुळे पिण्याची पाणी टाकी प्रथम भरली जाते.

42

मुंबईत पाण्याची संक्रांत अनेक भागांमध्ये कायम असून याचा  फटका महापालिका (BMC) आयुक्तांचे कार्यालय असलेल्या महापालिका मुख्यालयाला बसला आहे. मुख्यालय इमारतीला मागील काही दिवसांपासून टँकरने पाण्याचा पुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे पिण्या व्यतिरिक्त अन्य वापरासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे. फ्लशिंग करता असलेल्या पाच हजार लिटर क्षमतेच्या टाकीमध्ये दरदिवशी पाच टँकर खाली केले जात हे सर्व पाणी पिण्यायोग्य असते. त्यामुळे इतरांना पिण्याचा वापर जपून करा असे आवाहन करणाऱ्या महापालिका मुख्यलायातत पिण्याचा पाण्याचा वापर बाथरुमसाठी केले जात असल्याने ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान…’अशीच प्रचिती येत आहे.

bmc 6

मागील काही दिवसांपासून टँकरने पाणी पुरवठा

मुंबई महापालिका (BMC) मुख्यालयात मागील काही दिवसांपासून पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली असून फ्रशिंगकरता असलेली पाण्याची टाकी भरली जात नसल्याने टँकरद्वारे ही टाकी भरली जात आहे. मुख्यालय इमारतीला कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने याठिकाणी असलेल्या टाक्या पूर्णक्षमतेने भरल्या जात नाही. त्यामुळे पिण्याची पाणी टाकी प्रथम भरली जाते. परंतु फ्लशिंगकरता असलेली टाकी रिकामी राहत असल्याने मागील काही दिवसांपासून टँकर मागवून ही टाकी भरली जाते.

(हेही वाचा Hawkers : फेरीवाल्यांसाठी काय पण! महापालिकेचे अधिकारी आता न्यायालयालाही जुमानेनात)

पाण्याच्या टाकीची क्षमता ५ हजार लिटर

या पाण्याच्या टाकीची क्षमता ५ हजार लिटर एवढी असून ही टाकी पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी पाच टँकरची आवश्यकता असते. त्यामुळे आझाद मैदान जलाशय भरणा केंद्रातून टँकर मागवून पाण्याची टाकी भरली जाते. हे पिण्याचे पाणी असून पिण्याव्यतिरिक्त अन्य वापरासाठी या पाण्याचा वापर केला जात आहे.

पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरत नाही

महापालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, याठिकाणी टाकीत पाणी सोडण्याकरता असलेल्या उदंचन संचात अर्थात पंपामध्ये बिघाड झाल्याने ही परिस्थिती उदभवत आहे, तर काही  पाणी सोडणाऱ्या कामगारांच्या म्हणण्यानुसार पाणीच कमी दाबाने येत असल्याने येथील पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरत नाही.  त्यातच या पाण्याच्या टाकीचे आणि पाणी सोडण्याचे नियोजन अनेक वर्षांपासून करणारा कामगार हा मागील १ जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाला,तेव्हापासूनही ही समस्या अधिक निर्माण झाल्याचेही बोलले जाते.  मात्र, महापालिका मुख्यालय परिसरात रेन वॉटर हार्वेस्टींगची योजना राबवण्यासाठी पुरेशी जागा असतानाही  प्रशासनाकडून पिण्याव्यतिरिक्त अन्य वापरासाठी रेन वॉटर हार्वेस्टींगद्वारे पाणी  वापरण्याचा प्रयत्न न केल्याचे दिसून येत आहे.  त्यामुळे महापालिकेने स्वत:पासून या योजनेची सुरुवात केली असती तर इतर नागरिकांना पिण्याच्या  पाण्याची बचत करण्यासाठी तर वापरासाठी अन्य पाणी वापरण्यासाठी पुढाकार घेण्यास प्रवृत्त् करता आले असते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.