मंगळवार 24 मे रोजी नवी मुंबईतील मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनी व भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथे मान्सून पूर्व देखभाल व दुरूस्तीचे कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागात मंगळवार 24 मे रोजी संध्याकाळी पाणी पुरवठा केला जाणार नाही. तसेच सिडको क्षेत्रातील कामोठे व खारघरमध्ये केला जाणारा पाणीपुरवठा देखील बंद राहील. बुधवार 25 मे रोजी सुद्धा कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल.
( हेही वाचा : महाराष्ट्राचा हापूस थेट जो बायडन यांच्या दारी!)
या कालावधीमध्ये पाण्याचा वापर जपून आणि काटकसरीने करून सहकार्य करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना केले आहे.
Join Our WhatsApp Community