पुणेकरांनो…या भागात बुधवारी रात्रीपासून पाणीपुरवठा राहणार बंद

134

पुणेकरांसाठी पाणी पुरवठ्याबाबत एक महत्त्वाची बातमी आहे. बुधवारी रात्रीपासून पुण्यातील नागरिकांच्या घरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे शहरातील दुरूस्तीच्या कामासाठी पुणे शहराचा पाणीपुरवठा बुधवारी रात्रीपासून ते गुरूवारी दिवसभर बंद राहणार आहे. पुण्यातील पर्वती, बिबवेवाडी, सहकार नगर, शिवाजीनगर, कोथरूड, सेनापती बापट रस्ता यासह अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा बुधवारी रात्रीपासून व गुरूवारी दिवसभर बंद केला जाणार आहे. शुक्रवारी सकाळी उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा बंद असेल असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

(हेही वाचा – दाऊद गँगच्या मुसक्या मुंबई पोलीस आवळणार, गृहमंत्री फडणवीसांचे आदेश)

लष्कर जलकेंद्राचे अखत्यारीतील वानवडी इएसआर व हाय सर्व्हिस टाकी तसेच पर्वती जलकेंद्राचे अखत्यारीतील पर्वती एचएलआर येथे व एसएनडीटी एसएलआर येथे फ्लो मीटर बसविण्याचे नियोजन असल्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवार (ता.१६) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

पुण्याच्या या सर्व भागात पाणीपुरवठा बंद

वानवडी गाव, फातिमानगर, पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाचा संपूर्ण भाग, संपूर्ण डिफेन्स एरिया विभागाचा भाग, सोलापूर रोडच्या दोन्ही बाजू रामटेकडी चौकापर्यंत, सोपान बाग, उदय बाग, डोबरवाडी कवडे मळा संपूर्ण परिसर, बी.टी. कवडे रोड व संपूर्ण परिसर, पर्वती HLR, पर्वती गाव, सहकारनगर संपूर्ण, तावरे कॉलनी, आदर्श नगर, पर्वती इंडस्ट्रियल इस्टेट, वाळवेकर नगर, संतनगर, नव महाराज सोसायटी, सारंग सोसायटी, मित्रमंडळ कॉलनी, पर्वती दर्शन, शिवदर्शन, एसबीआय कॉलनी, अरण्येश्वर, कोंढवा, बिबवेवाडी, अप्पर- बिबवेवाडी, मार्केट यार्ड, बिबवेवाडी ओटा, महेश सोसायटी, कात्रज कोंढवा, गंगाधाम परिसर, डायस प्लॉट, महर्षीनगर, सॅलिसबरी पार्क, संदेशनगर, मीरा सोसायटी, एसटी कॉलनी, स्वारगेट, संभाजीनगर धनकवडी (चव्हाणनगर), अप्पर, इंदिरानगर, कोंढवा खुर्द, शिवनेरी नगर, कोंढवा गावठाण, स.नं. ३५४, मोरे चाळ, गव्हाणे चाळ, भाग्योदयनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, साईबाबानगर, स.नं. ४२,४३, युनिटी पार्क, ज्ञानेश्वर नगर, सवेरा पार्क परिसर. पुण्याच्या या सर्व भागात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.