मुंबई महापालिकेच्या पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलीमीटर वाहिनीवरील ३०० मिलीमीटर बायपास जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम, तसेच वेरावली जलाशय १ व २ साठी १८०० मिलीमीटर व्यासाची नवीन वाहिनीच्या (इनलेट) जोडणीसाठी दोन १८०० मिलीमीटर जोडकाम मंगळवारी २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजता हाती घेण्यात येणार आहे. हे काम बुधवारी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
धारावी( जी/उत्तर) विभागातील काही परिसरात २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
( हेही वाचा: ‘बेस्ट’ बस थांब्यांजवळ प्रवाशांना ‘इलेक्ट्रिक बाईक’ सेवा, फक्त २० रुपयात फिरा, कुठे कराल नोंदणी? )
धारावी पाणीपुरवठा क्षेत्र (सकाळी) – (पहाटे ४.०० ते दुपारी १२.०० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (२९.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० ते दिनांक ३०.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने राहील).
धारावी पाणीपुरावठा क्षेत्र (सायंकाळी) – (पहाटे ४.०० ते रात्री ९.०० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (२९.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० ते दिनांक ३०.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने राहील).
Join Our WhatsApp Community