ठाण्यातील काही भागात २४ तास पाणी पुरवठा राहणार बंद

129

ठाणे महानगरपालिकेच्या रॉ वॉटर पाईपलाईनची कल्याण फाटा भिवंडी येथे NH -4 च्या कामातंर्गत गळती काढणे, पावसाळ्यापूर्वी टेमघर येथे 22 केव्ही सबस्टेशनमध्ये अत्यावश्यक कामे, तसेच टेमघर जलशुध्दिकेंद्रामध्ये रॉ वॉटर (PAC) पाईपलाईनला जलमापक लावणे, टेमघर जलशुध्दिकरण केंद्रामधील सॅन्ड फिल्टरची दुरूस्ती करणे, बापगावजवळ रॉ वॉटर पाईपलाईनची जोडणी करण्यात येणार आहे यामुळे प्राधिकरणाच्यावतीने पावसाळ्याअगोदर दैनंदिन देखभाल दुरूस्तीची कामे करण्याकरिता ठाणे शहराचा बुधवार दिनांक 1 जून 2022 रोजी सकाळी 9.00 ते गुरूवार सकाळी 9.00 वाजेपर्यत २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

( हेही वाचा : महापालिका आरक्षण सोडत : महिलांसाठी आरक्षित प्रभाग जाहीर)

या भागात पाणी कपात

घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, समतानगर, गांधीनगर, सिध्दांचल, आकृती, सिध्देश्वर, जॉन्स्न, इटर्निटी, ब्रह्मांड, विजयनगरी, गायमुख, बाळकुम, कोलशेत, आझादनगर, ऋतुपार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, डिफेन्स, येऊर, विठ्ठल क्रिडा मंडळ, सुरकुरपाडा तसेच कळवा व मुंब्र्याच्या काही भागात पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे.

वरील शटडाऊनमुळे पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.